सांगलीत पुष्कराज चाैकात अपघातामध्ये एकजण जागीच ठार 

विजय पाटील, शैलेश पेटकर
गुरुवार, 8 फेब्रुवारी 2018

सांगली - येथील पुष्कराज चाैकात आज दुपारी ट्रक व दुचाकीच्या अपघातामध्ये एकजण जागीच ठार झाला. यासिन गाैस सनदी (वय 55) असे मृत्य व्यक्तीचे नाव आहे. अपघातानंतर संतप्त जमावाने ट्रकवर दगडफेक केली. 

सांगली - येथील पुष्कराज चाैकात आज दुपारी ट्रक व दुचाकीच्या अपघातामध्ये एकजण जागीच ठार झाला. यासिन गाैस सनदी (वय 55) असे मृत्य व्यक्तीचे नाव आहे. अपघातानंतर संतप्त जमावाने ट्रकवर दगडफेक केली. 

घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी - पुष्पराज चौक येथे आज दुपारी  शासकिय धान्य वितरण करणाऱ्या ट्रकची (एमएच 09 एल 4420) एका दुचाकी वाहनास धडक बसली. दुचाकीस्वार ट्रकच्या खाली सापडल्याने तो जागीच ठार झाला. मिरजेकडून सांगली शहराच्या राममंदिरकडे ट्रक निघाला होता तर माळी टॉकीजकडून  काळीखण दिशेने दुचाकीस्वार निघाले असता पुष्पराज चौकाच्या मध्ये हा अपघात झाला आहे. अपघातानंतर ट्रक चालकाने पळ काढल्याने संतप्त जमावाने ट्रकवर दगडफेक केली. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले.

Web Title: Sangli News one dead in an accident near Pushkraj Chouk