उष्माघाताने सांगलीत वृद्धेचा बळी

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 15 एप्रिल 2018

सांगली - दिवसेंदिवस वाढत चाललेल्या तापमानाने आता नागरिकांनाही उष्माघाताचा त्रास जाणवत आहे. शनिवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास घाटगे-पाटील शोरूमसमोर एका ६१ वर्षीय महिलेचा उष्माघाताने मृत्यू झाला.

सांगली - दिवसेंदिवस वाढत चाललेल्या तापमानाने आता नागरिकांनाही उष्माघाताचा त्रास जाणवत आहे. शनिवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास घाटगे-पाटील शोरूमसमोर एका ६१ वर्षीय महिलेचा उष्माघाताने मृत्यू झाला.

महिलेस अचानक चक्कर आली आणि ती जागेवरच पडली. नागरिकांनी त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल केले. मात्र, त्यांचा मृत्यू झाला. प्रतीक्षा उल्हास धनवडे असे या महिलेचे नाव आहे. प्रतीक्षा नलवडे या पत्रकारनगरमध्ये अरिहंत कॉलनीत राहतात. त्या धुणी-भांडी करण्याचे काम करत होत्या. आज दुपारी त्या कामासाठी बाहेर होत्या. दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास शंभर फुटी रोडवर घाटगे-पाटील शोरूमसमोर त्यांना चक्कर येऊन त्या जागेवरच कोसळल्या. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल केले. मात्र, त्यांचा मृत्यू झाला होता.

काही दिवसांत पारा ३९-४० अंशांपर्यंत गेल्याने उष्म्याचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे वृद्ध, अतिश्रम करणाऱ्यांना उष्माघाताचा धोका असतो. कालच विट्यात पोलिस भरतीसाठी सराव करणाऱ्या वीस वर्षीय युवतीचा धावत असताना चक्कर येऊन पडल्याने मृत्यू झाला; तर खरसुंडी यात्रेत भर दुपारी एका वृद्धाचा अचानक हृदयविकाराच्या झटक्‍याने मृत्यू झाला. हे दोन्ही मृत्यूही उष्माघाताने झाल्याची चर्चा आहे.

आठ दिवसांतील तापमान (अंश सेल्सिअसमध्ये)
वार    तारीख    तापमान
रविवार    ८    ३६
सोमवार    ९    ३६
मंगळवार    १०    ३७
बुधवार    ११    ३८
गुरुवार    १२    ३८
शुक्रवार    १३    ३८
शनिवार    १४    ३९
 

 

Web Title: Sangli News one dead in due to Heat stroke