भरधाव ट्रकच्या धडकेत सांगलीत एकजण ठार ; एक जखमी 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 1 नोव्हेंबर 2017

सांगली - वसंतदादा औद्योगिक वसाहतीत आज दुपारी एका भरधाव ट्रकने धडक दिल्याने एकजण ठार झाला, एकजण जखमी झाले. हे दोघेही वसंतदादा साखर कारखान्यातील कामगार होते. या प्रकरणी संजयनगर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. 

सांगली - वसंतदादा औद्योगिक वसाहतीत आज दुपारी एका भरधाव ट्रकने धडक दिल्याने एकजण ठार झाला, एकजण जखमी झाले. हे दोघेही वसंतदादा साखर कारखान्यातील कामगार होते. या प्रकरणी संजयनगर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. 

याबाबत अधिक माहिती अशी, वसंतदादा औद्योगिक वसाहतीमधून आज दुपारी एक वाजण्याच्या सुमारास संजय शिवाजी महाजन (वय 38, कवलापूर) आणि सचिन जिनाप्पा कोळी (वय 38, रा. इनामधामणी) हे दोघेजण मोटर सायकलवरुन निघाले होते. यावेळी त्यांच्या मागूनच एक ट्रक (क्र. एम.एच 11, एम, 6261) वेगाने येत होता. या ट्रकची मागून मोटरसायकलला जोराची धडक बसली. यामध्ये मागे बसलेले संजय महाजन यांच्या मांडीवरुन ट्रकचे चाक गेले. तर सचिन कोळी दुसऱ्या बाजूला पडल्याने ते किरकोळ जखमी झाले. त्यांच्या पायाला दुखापत झाली. 

अपघातानंतर ट्रक चालक न थांबवता पळून गेला. त्यामुळे त्याला पकडता आले नाही. घटनास्थळी नागरिकांनी तातडीने दोघांना उपचारासाठी हलवले. मात्र संजय महाजन यांच्यावर उपचार सुरु असताना त्यांचे निधन झाले. अपघाताचे वृत्त कळताच कारखान्यातील कामगारांनी शासकीय रुग्णालयात गर्दी केली होती. अचानक घडलेल्या घटनेत महाजन यांचा मृत्यू झाल्याने कामगार वर्गात हळहळ व्यक्त होत होती. 

Web Title: Sangli News one dead in road Accident