ऑनलाईन फसवणूकीचे धागे नोयडापर्यंत

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 1 जुलै 2018

मिरज - विम्याचे पैसे देण्याचे आमिष दाखवून महिलेची ४२ लाख ५० हजार रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी पोलिसांनी बॅंकांकडे चौकशी सुरू केली आहे. ज्या बॅंकेतून हे पैसे ज्या पद्धतीने संबंधित ठकसेन महिलेस मिळाले त्या महिलेच्या खात्याचा तपशील पोलिसांनी मिळवला आहे.

मिरज - विम्याचे पैसे देण्याचे आमिष दाखवून महिलेची ४२ लाख ५० हजार रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी पोलिसांनी बॅंकांकडे चौकशी सुरू केली आहे. ज्या बॅंकेतून हे पैसे ज्या पद्धतीने संबंधित ठकसेन महिलेस मिळाले त्या महिलेच्या खात्याचा तपशील पोलिसांनी मिळवला आहे.

नोयडा परिसरातून ही महिला संपर्क साधत असून तिचे बॅंक खातेही याच परिसरातील बॅंकेत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. हा तपास महात्मा गांधी पोलिस ठाणे आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागासह आर्थिक गुन्हे आणि सायबर क्राईम विभाग या चार विभागांकडून संयुक्तपणे होणार आहे. 

बॅंक खात्यांचा तपशील बेमालुमपणे जाणून घेऊन त्यातून पैसे काढून घेण्याचे प्रकार सांगली, मिरज परिसरात वाढले आहेत. यामध्ये प्रामुख्याने मिरज शहरातील परदेशातून आलेल्या किंवा परदेशी वास्तव्य असणाऱ्या आणि त्यांच्या नातेवाइकांच्या खात्यांवरील पैसे काढून घेण्याच्या गुन्ह्यांमध्ये गेल्या काही महिन्यात बरीच वाढ झाली आहे. त्यामुळे अनेक खातेदार हे कंगाल झाले आहेत. त्यामुळे अशा वाढत्या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी या गुन्ह्यांचे भारतामधील संशयितांना जेरबंद करण्यासाठी पोलिस यंत्रणेने आता तयारी केली आहे. 

पोलिस मुळाशी जाणार
संबंधित पोलिस ठाणे, स्थानिक गुन्हे अन्वेषण, सायबर क्राईम आणि आर्थिक गुन्हे या चार शाखांमधील निवडक अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या स्वतंत्र पथकाची नियुक्ती करण्याच्या हालचाली पोलिस यंत्रणेत सुरू आहेत. मिरजमधील सविता अरुण सूर्यवंशी या महिलेची अशा प्रकारे तब्बल ४२ लाख ५० हजार रुपयांची झालेली फसवणूक ही सर्वाधिक रकमेची फसवणूक असल्याने पोलिस यंत्रणेने आता अशा गुन्ह्यांच्या मुळाशी जाण्याचे ठरविले असल्याचे पोलिस सूत्रांकडून सांगण्यात आले.

संबंधीत बातम्या -

मिरजेत महिलेला ४२ लाखांचा गंडा  

Web Title: Sangli News Online Fraud in Miraj