पलूस-कडेगावमधून भाजप लढणारच

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 9 मे 2018

सांगली - जिल्ह्यातील पलूस-कडेगाव विधानसभा मतदार संघाच्या पोटनिवडणुकीच्या मैदानात उतरण्याचा निर्णय मंगळवारी मुंबईत भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी घेतला. माजी आमदार पृथ्वीराज देशमुख हे उमेदवार असतील. ते गुरुवारी (ता. १०) पक्षातर्फे अर्ज दाखल करणार आहेत. 

सांगली - जिल्ह्यातील पलूस-कडेगाव विधानसभा मतदार संघाच्या पोटनिवडणुकीच्या मैदानात उतरण्याचा निर्णय मंगळवारी मुंबईत भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी घेतला. माजी आमदार पृथ्वीराज देशमुख हे उमेदवार असतील. ते गुरुवारी (ता. १०) पक्षातर्फे अर्ज दाखल करणार आहेत. 

देशमुख यांनीही पक्षादेशानुसार निवडणूक लढवण्यासाठी सज्ज असल्याचे पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिवंगत आमदार पतंगराव कदम यांच्या निधनामुळे पोटनिवडणूक होत आहे. २८ मे रोजी मतदान आहे. कदम यांचे चिरंजीव, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष विश्वजित कदम यांना उमेदवारी मिळाली आहे. त्यांनी काल (ता.७) माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह वरिष्ठ नेते व कार्यकर्त्यांसमवेत उमेदवारी अर्ज दाखल केला. त्याचवेळी काँग्रेसच्या नेत्यांनी निवडणूक बिनविरोध व्हावी, यासाठी इतर पक्षनेत्यांशी चर्चा करणार असल्याचे सांगितले होते.

या पार्श्वभूमीवर आज मुंबईत झालेल्या भाजपच्या बैठकीकडे जिल्ह्याचे लक्ष होते. सायंकाळी भाजपने पोटनिवडणूक लढवण्याचा विचार केल्याची बातमी सांगलीत येऊन धडकली. प्रदेश सरचिटणीस मकरंद देशपांडे यांनी त्याला दुजोरा दिला आहे. सध्याचा पलुस-कडेगाव व पूर्वीच्या भिलवडी-वांगी मतदार संघातही देशमुख घराणे कदम घराण्याचे पारंपारिक विरोधक आहेत. दोघेही नेहमीच निवडणूक मैदानात उतरलेत. 

उद्या (ता. १०) दुपारपर्यंत पक्षाचा आदेश येईल. निवडणूक लढविण्याची तयारी असल्याचे अगोदरच पक्षाला कळवले आहे. पक्षादेशावर अंमल केला जाईल.
- पृथ्वीराज देशमुख

Web Title: Sangli News Palus - Kadegaon election