खोकीधारकांचा १५ दिवसांचा अल्टिमेटम

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 19 सप्टेंबर 2017

सांगली - महापालिका हद्दीतील खोकीधारकांच्या पुनर्वसनासाठी सांगली जिल्हा पान असोसिएशनच्या वतीने महापालिकेवर मोर्चा काढला. खोकीधारकांनी प्रशासनाला पंधरा दिवसांचा अल्टिमेटम दिला असून, प्रसंगी महापौर व आयुक्तांच्या घरासमोर आंदोलनाचा इशारा दिला आहे. अध्यक्ष अजित सूर्यवंशी, रत्नाकर नांगरे, युसूफ जमादार यांनी नेतृत्व केले.

मोर्चाला स्टेशन चौकातून सुरवात झाली. महापालिकेसमोर सभा झाली. तीत सूर्यवंशी म्हणाले, ‘‘मुव्हेबल व पक्‍क्‍या गाळ्यांत पुनर्वसनाचा निर्णय नेते मदन पाटील यांनी घेतला. त्यासाठी खोकी हटवून  सहकार्य केले होते. आतापर्यंत दीड हजार खोकीधारकांचे पुनर्वसन झाले, मात्र उर्वरित हजारांवर खोकीधारकांचे पुनर्वसन रखडले आहे. आमचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र पुनर्वसनात आडकाठीच सुरू आहे. आश्वासने नकोत. आता महापौरांच्या अध्यक्षतेखाली तत्काळ समिती नेमून काम सुरू करा.’’

जिल्हाध्यक्ष नांगरे म्हणाले,‘‘गणेश मार्केटसह इतर ठिकाणच्या गाळेधारकांच्या हस्तांतरणाच्या फायली पडून आहेत. मथुबाई कन्या महाविद्यालयाच्या पश्‍चिम बाजूस खोकी पुनर्वसन करावे, जुन्या स्टेशन चौक बसस्थानकामागे, शासकीय रुग्णालय, विश्रामबाग रेल्वे गेट, विश्रामबाग जुना जकात नाका येथे सर्वत्र तातडीने  पुनर्वसन करा. संयमाचा बांध सुटण्याची वेळ पाहू  नका.’’ 

यावेळी राजू पागे, एकनाथ सूर्यवंशी, प्रकाश कोकाटे, मन्सूर नरवाडे, मयूर बांगर, अशोक कारंडे, गणेश कोडते, महेश हरमलकर, मकरंद जमदाडे, राजकुमार खोत, राजू पागे, राजू खोत, प्रकाश मोरे आदींसह शेकडो खोकीधारक उपस्थित होते.

Web Title: sangli news pan shop association protest rally