हिवाळी अधिवेशन चालू देणार नाही - पतंगराव कदम 

जयसिंग कुंभार
सोमवार, 13 नोव्हेंबर 2017

सांगली - राज्यातल्या ढासळलेल्या कायदा सुव्यवस्थेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सर्वस्वी जबाबदार आहेत. त्यांनी एक लक्षात घ्यावे की हिवाळी अधिवेशन आम्ही चालू देणार नाही. सरकारला सळो की पळो करून सोडू, असा इशारा आमदार पतंगराव कदम यांनी आज दिला.

पत्रकार संघटनेच्यावतीने आयोजित कार्यक्रमासाठी ते सांगलीत आले होते. यावेळी त्यांनी सांगलीतील पोलिस अत्याचारात बळी पडलेल्या अनिकेत कोथळे प्रकरणाच्या रोखाने राज्य सरकारवर हल्ला केला. 

ते म्हणाले,"" सांगलीतील पोलिस अत्याचाराचे प्रकरण भयानक आहे. असे कधी घडले नव्हते. कोणाचा कुणाला पायपोस उरलेला नाही. त्या पिडित कुटुंबाच्या मागे आम्ही उभे राहूच. मात्र या प्रकाराबाबत सरकार गंभीर नाही हे अधिक चिंताजनक आहे. येत्या 11 डिसेंबरपासून हिवाळी अधिवेशनाला सुरवात होत आहे. पहिल्या दिवशीपासूनच सरकारला ढासळलेल्या कायदा सुव्यवस्थेबाबत बोलावे लागेल. चिंता वाटावी अशी प्रकरणे राज्यभर होत आहेत. गुन्हेगार कमी की काय म्हणून पोलिसच गुन्हेगारांसारखे वागत आहेत.'' 

श्री. कदम यांनी आज माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यासमवेत कोथळे कुटुंबियांची भेट घेतली. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेतही त्यांनी सांगली जिल्ह्यात फोफावलेल्या मटक्‍याकडे लक्ष वेधले. तीन वर्षापुर्वीची सांगली जिल्ह्यातील मटक्‍याची स्थिती आणि आजची स्थिती याचा फरक जनतेनेच करावा.''

Web Title: Sangli News Patangrao Kadam Press