कायदा सुव्यवस्थेचे गृहविभागाने पोस्टमार्टेम करावे - पतंगराव कदम

मुंबई : सांगलीत अनिकेत कोथळे यांच्या कोठडीत झालेल्या मारहाणीनंतर झालेल्या मृत्यूप्रकरणी गृह विभागाचे मुख्य सचिव सुधीर श्रीवास्तव यांची आमदार पतंगराव कदम यांनी गुरुवारी भेट घेतली.
मुंबई : सांगलीत अनिकेत कोथळे यांच्या कोठडीत झालेल्या मारहाणीनंतर झालेल्या मृत्यूप्रकरणी गृह विभागाचे मुख्य सचिव सुधीर श्रीवास्तव यांची आमदार पतंगराव कदम यांनी गुरुवारी भेट घेतली.

कडेगाव - जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था बिघडली आहे. त्याचे तातडीने पोस्टमार्टेम करावे, अशी मागणी आमदार पतंगराव कदम यांनी गृह विभागाचे मुख्य सचिव सुधीर श्रीवास्तव यांच्याकडे मुंबई  येथे केली. अनिकेतच्या मृत्यूकरणी श्री. श्रीवास्तव यांची त्यांनी  भेट घेतली.

सांगलीत शहर पोलिस ठाण्यात अनिकेत कोथळेचा पोलिसांच्या मारहाणीनंतर कोठडीतच मृत्यू झाल्या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी. अनिकेतच्या कुटुंबीयांना न्याय मिळाला पाहिजे, अशही मागणी त्यांनी केली आहे. 

ते म्हणाले,‘‘पोलिस उपनिरीक्षक युवराज कामटे व सहकाऱ्यांनी केलेल्या अमानुष मारहाणीत अनिकेत कोथळेचा मृत्यू झाला. पोलिसांनी कोथळेचा मृतदेह आंबोली घाटात नेऊन दोनदा जाळला. युवराज कामटे आणि त्याच्या साथीदारांचे हे कृत्य म्हणजे खाकी वर्दीला काळिमा फसणारे आहे. सर्व आरोपींना कठोर शिक्षा झाली पाहिजे.’’

ते म्हणाले, ‘‘जिल्ह्यात सावकारी, अवैध दारू विक्री, मटका असे अवैध धंदे राजरोसपणे सुरू आहेत. बलात्कार, चोऱ्या, दरोडे आदी गुन्ह्यांचे प्रमाण वाढले आहे. कायदा-सुव्यवस्था बिघडल्याने पोलिसांची प्रतिमा डागाळली आहे. कोथळे मृत्यू घटनेने राज्यात गृह विभागाची लक्तरे वेशीवर टांगली गेलीत. राज्याच्या गृह विभागाने कठोर पावले उचलून गृह विभागात योग्य ते फेरबदल केले पाहिजेत. गुन्हेगार, गुंड पोलिसांना सापडत नाहीत. निष्पाप व्यक्तींवर मस्तवाल पोलिस दबंगगिरी करतात. अशावेळी गृहविभागने तत्काळ सुधारणा घडवून आणणे गरजेचे आहे. त्यावर श्री. श्रीवास्तव यांनी प्रमुख पोलिस अधिकाऱ्यांशी तत्काळ संपर्क साधला. स्वतः लक्ष घालून योग्य त्या ठोस उपाययोजना तातडीने करीत असल्याचे आश्‍वासन 
दिले आहे.’’

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com