दीड महिन्यात पेट्रोल दरवाढीचा झटका

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 28 ऑगस्ट 2017

पेट्रोलमध्ये पाच, डिझेलमध्ये २.३२ रुपयांची वाढ : रोज दहा ते पंधरा पैशांनी चढती कमान

सांगली - पेट्रोल-डिझेलचे दर रोज बदलणारी ‘डायनॅमिक प्राईसिंग’ पद्धत सुरू करताना पेट्रोल दरात १ रुपये १२ पैसे आणि डिझेलमध्ये १ रुपये २४ पैसे कपात केली. पंधरवड्यात दर कमी झाले; परंतु गेल्या दीड महिन्यात पेट्रोल दरात एक-दोन नव्हे, तर पाच रुपयांनी वाढ झाली. डिझेल दरात तुलनेने २ रुपये ३२ पैशांची वाढ झाली. दररोज दहा ते पंधरा पैशांनी होणारी वाढ ‘स्लो पॉयझनिंग’सारखी असल्यामुळे ग्राहकांच्या फारशी लक्षात आली नाही.

आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाचे दर दररोज बदलत असतात; तर आपल्याकडील दर पूर्वी पंधरा दिवसांनी बदलले जात होते. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेप्रमाणे पेट्रोल-डिझेलचे दर बदलले जाण्याबाबत सरकार अनुकूल होते. त्यामुळे १६ जूनपासून दररोज दर बदलणारी ‘डायनॅमिक प्राईसिंग’ पद्धत अमलात आणली. ही पद्धत सुरू करतानाच पेट्रोल दरात १ रुपये १२ पैसे आणि डिझेलमध्ये १ रुपये २४ पैसे कमी करून ग्राहकांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला. पहिल्या पंधरवड्यात दोन ते अडीच रुपयांपर्यंत पेट्रोल-डिझेलचे दर कमी झाले. त्यामुळे ग्राहकांनी स्वागत केले.

पेट्रोल-डिझेलचे कमी झालेले दर दीड महिन्यापासून दररोज दहा ते पंधरा पैशांनी वाढत चालल्याचे ग्राहकांच्या लक्षातच आले नाही. दररोज दर बदलत असल्यामुळे ग्राहकांनी या प्रणालीकडे फारसे लक्ष दिले नाही. सर्रास ग्राहक लिटरप्रमाणे पेट्रोल न घेता थेट शंभराची नोट देतात. त्यामुळे लिटरच्या पुढे किती पॉइंट पेट्रोल मिळते, ते लक्षात ठेवले जात नाही. ‘स्लो पॉयझनिंग’प्रमाणे दररोज दर वाढण्याचा प्रकार दीड महिन्यापासून सुरू आहे. दीड महिन्यात पेट्रोल आणि पॉवर पेट्रोल ४ रुपये ९२ पैशांनी वाढले. डिझेलमध्ये फारशी वाढ नसली, तरी २ रुपये ३२ पैशांनी वाढ झालीच आहे.

दीड महिन्यात पेट्रोलमध्ये पैशापैशांनी वाढच होत चालली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा दरवाढीचा उच्चांक गाठल्यास आश्‍चर्य वाटायला नको अशी परिस्थिती आहे.

Web Title: sangli news petrol rate increase