नेर्लेत एकाकडून पिस्तूल जप्त 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 11 सप्टेंबर 2017

सांगली - नेर्ले (ता. वाळवा) येथील हॉटेल मणिकंडणसमोर राजू तानाजी कुंभार (वय 22, रा. यशवंतनगर, सह्याद्री साखर कारखाना क्वॉर्टर्स, कऱ्हाड) याला गुंडाविरोधी पथकाने ताब्यात घेऊन पिस्तूल आणि चार काडतुसे जप्त केली. कुंभारविरुद्ध कासेगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला. 

नवरात्रीच्या पार्श्‍वभूमीवर जिल्ह्यात कोठेही गुन्हे घडू नयेत म्हणून पोलिस अधीक्षक दत्तात्रय शिंदे, अप्पर अधीक्षक शशिकांत बोराटे यांनी गुंडाविरोधी पथकाला आदेश दिले आहेत. बेकायदा हत्यार बाळगणाऱ्यांविरुद्ध कारवाईसाठी पथक सज्ज आहे. सहायक निरीक्षक संतोष डोके यांना एका खबऱ्यामार्फत नेर्लेतील हॉटेल मणिकंडणसमोर एकजण पिस्तूल विक्रीसाठी येणार असल्याची माहिती मिळाली. श्री. डोके आणि पथक तत्काळ तिकडे रवाना झाले. हॉटेलच्या पार्किंगमध्ये राजू कुंभार हा संशयास्पदरित्या थांबला होता. पथकाने सापळा रचून त्याला ताब्यात घेतले. झडती घेतल्यानंतर त्याच्याकडे पिस्तूल आणि चार जिवंत काडतुसे मिळाली. त्याची किंमत 51 हजार 600 रुपये आहे. 

कुंभारला ताब्यात घेऊन कासेगाव पोलिस ठाण्यात आणून गुन्हा दाखल करण्यात आला. तपासासाठी कासेगाव पोलिसांच्या ताब्यात दिले. कुंभार कोणाला पिस्तूल विक्री करणार होता, याचा तपास कासेगाव पोलिस करीत आहेत. गुंडाविरोधी पथकाचे कर्मचारी श्री. मोरे, सुनील भिसे, महेश आवळे, शंकर पाटील, मेघराज रूपनर, योगेश खराडे, वैभव पाटील, संकेत कानडे, संतोष गळवे, आर्यन देशिंगकर, किरण खोत यांच्या पथकाने ही कारवाई केली.

Web Title: sangli news Pistol crime