महापालिकेच्या खुल्या भूखंडावर वृक्षारोपण 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 29 जून 2017

सांगली - महापालिका क्षेत्रात यंदा 25 हजार वृक्षलागवडीचे उद्दिष्ट आहे. मोहिमेसाठी सांगलीकरांनी एकजूट केली आहे. महापालिकेच्या खुल्या भूखंडावर वृक्षारोपण करण्यासाठी नगरसेवकांनी पुढाकार घेतला असून, त्याची जोरदार तयारी प्रत्येक प्रभागात सुरू आहे. आयुक्त रवींद्र खेबुडकर यांच्या अध्यक्षतेखाली महापालिकेत बैठक झाली. 

बैठकीला सजग नागरिक, स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते. उपायुक्त सुनील पवार, वृक्षाधिकारी एस. ए. कोरे यांच्यासह प्रमुख नगरसेवकांची प्रमुख उपस्थिती होती. महापालिका क्षेत्रातील हिरवाई चांगली आहे. हे प्रमाण टिकवणे आणि वाढवण्यासाठी विविध सूचना मांडण्यात आली. लोकसहभागातून शहरातील खुल्या जागांवर हिरवाई करण्यासाठी नियोजन करण्यात आले. त्याठिकाणी रोपे जगावित यासाठी पूर्ण उंचीची झाडे लावली जाणार आहेत. तसेच प्रत्येक प्रभागातील नागरिकांनाही यात सहभागी करून घेतले जाणार आहे. सामाजिक संस्थांनी झाडे दत्तक घेण्याचा निर्णय घेतला आहे. 

""महापालिकेच्या वृक्षारोपण मोहिमेत सांगलीकरांनी उत्स्फूर्त सहभागी व्हावे. अमराईत उद्यानात झाडे उपलब्ध असून, नागरिकांनी त्याचा लाभ घ्यावा. तसेच स्वयंसेवी संस्थांनीही पुढाकार घेऊन वृक्षारोपण करावे.'' 
- रवींद्र खेबुडकर, आयुक्त. 

Web Title: sangli news Plantation