अनिकेत कोथळेच्या मृतदेहाची साडेसहा तास उत्तरीय तपासणी 

sangli-crime-case
sangli-crime-case

मिरज - सांगली पोलीस ठाण्यात पोलिसांच्या मारहाणीचा बळी ठरलेल्या अनिकेत कोथळेच्या मृतदेहाची मिरज शासकीय रुग्णालयात आज (शुक्रवार ) उत्तरीय तपासणी करण्यात आली.तीन वैदयकिय अधिकाऱ्यांनी सांगलीच्या महिला न्यायाधीश श्रीमती खापे यांच्या उपस्थितीत हि तपासणी केली. तत्पूर्वी मृतदेह अनिकेतचा भाऊ आशिष याला दाखवण्यात आला. त्याने हा मृतदेह आपल्या भावाचा नसल्याचे सांगत उत्तरीय तपासणीनंतर मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला त्यामुळे अनिकेत चा मृतदेह मिरज शासकीय रुग्णालयाच्या शवागारात ठेवण्यात आला आहे . 

अनिकेतच्या मृतदेह आंबोली घाटात नेऊन जाळल्याची माहिती संशियितांकडून मिळताच पोलीस उपअधीक्षक डि. एस. पाटील यांच्या नेतृत्वाखालील पोलिसांचे पथक तातडीने आंबोलीस रवाना झाले. परंतु तेथे या पथकाने स्थानिक पोलिसांच्या सहकार्याने आंबोली परिसरात शोध घेऊनही मृतदेहाचे अवशेष मिळाले नाही. त्यामुळे या पथकाने परत मिरजेला येऊन संशियितांपैकी अनिल लाड याला आंबोलीस नेऊन नेमके ठिकाण जाणून घेतले. हे ठिकाण महादेव गड पॉईंट येथील पार्किंगच्या बाजूला असल्याचे समजले त्यानंतर या पथकाने सावंतवाडीचे न्यायाधीश श्री बुधवंत,नायब तहसीलदार शिवराम जाधव यांच्या उपस्तिथीत फॉरेन्सिक लॅब च्या तंत्रज्ञान समवेत मृतदेह जळालेल्या जागेचा आणि अर्धवट जळालेल्या मृतदेहाचा पंचनामा करून सायंकाळी मृतदेह मिरजेकडे रवाना करण्यात आला. रात्री उशिरा मृतदेह मिरज शासकीय रुग्णालयात पोहचला. त्यानंतर मृतदेह अनिकेतच्या भाऊ आशिष याला दाखवण्यात आला . त्याने मृतदेह पाहून हा मृतदेह आपला भाऊ अनिकेतचा नसल्याचे सांगितले आणि मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला .मृतदेहाची डीएनए- तपासणी केल्यानंतर हा मृतदेह अनिकेत चा असल्याचे सिद्ध झाले तरच आपण हा मृतदेह अंत्यसंस्कारासाठी ताब्यात घेऊ असे सांगितले.त्यानंतर सकाळी नऊ वाजता मृतदेहाची उत्तरीय तपासणी सुरु झाली .ती दुपारी तीन च्या सुमारास संपली .या तपासणीवेळी वैद्यकीय पथकाने मृतदेहाचे विविध अवशेष आणि नमुने तपासणीसाठी सरकारी पंचासमक्ष सील केले. ते विविध ठिकाणी तपासणी साठी पाठवण्यात येणार आहेत. यावेळी मिरज शासकीय रुग्णालयात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com