आत्महत्येच्या बदल्‍यासाठीच पोलिसपुत्राचा खून

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 16 जुलै 2017

सांगली - शिरोळ येथील पोलिसपुत्र शाहरूख शब्बीर बोजगर याच्या खूनप्रकरणी कुपवाड येथील शामनगरमधून रवींद्र जीवन नगरकर, त्याची मुले रोहित, सुमित आणि नातेवाईक आकाश माछरे यांना निपाणी पोलिसांनी अटक केली. त्यामुळे कुपवाड परिसरात खळबळ उडाली आहे.

रवींद्र याच्या मुलीने सहा महिन्यांपूर्वी प्रेमप्रकरणातून आत्महत्या केली होती. आत्महत्येला कारणीभूत शाहरूखच असल्याचा नगरकरचा समज होता. त्यामुळे त्याचा बदला घेण्यासाठी कट रचून शाहरूखचा खून केल्याची धक्कादायक माहिती निपाणी व इचलकरंजी पोलिसांच्या तपासात स्पष्ट झाली आहे.

रवींद्रच्या मुलीचा यापूर्वी विवाह झाला होता. तिला एक अपत्य झाले आहे. कौटुंबिक मतभेदातून तिने घटस्फोट घेतला होता. त्यानंतर ती माहेरी परतली होती. त्यानंतर काही महिन्यांपूर्वी शिरोळ येथील शाहरूखशी ओळख झाली. दोघांचे प्रेमप्रकरण काही दिवस सुरू होते. सहा-सात महिन्यांपूर्वी शाहरूखला ती घटस्फोटीत असून एक अपत्य असल्याची माहिती समजली. त्यामुळे त्यांच्यात वाद झाला. या प्रकारानंतर नगरकर याच्या मुलीने कुपवाडला आत्महत्या केली. तिच्या आत्महत्येची माहिती पोलिसांना दिली गेली नाही. मात्र या आत्महत्येची चर्चा परिसरात होती.

मुलीच्या आत्महत्येचा बदला घेण्याचा कट रवींद्र आणि त्याच्या मुलांनी रचला. कोल्हापूर येथून शाहरूख याचे अपहरण करून कर्नाटकातील हणबरवाडी येथे  त्याचा खून केला. निपाणी पोलिसांनी कोल्हापूर आणि इचलकरंजी पोलिसांच्या मदतीने तपास सुरू केला. तपासात काही सीसीटीव्ही फुटेजमधून संशयित स्पष्ट झाले. इचलकरंजी एलसीबी च्या पथकाने गुरुवारी रात्री कुपवाडमधून संशयितांना ताब्यात घेतले. त्यानंतर काल (ता.१४) इचलकरंजी पोलिसांनी संशयितांना निपाणी पोलिसांच्या ताब्यात दिले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार नगरकर याने दोन मुले व नातेवाईकाच्या मदतीने मुलीच्या आत्महत्येचा बदला घेण्यासाठी अतिशय थंड डोक्‍याने शाहरूखचा खून केल्याचे स्पष्ट झाले. 

आत्महत्येची नोंदच नाही
नगरकर याच्या मुलीने आत्महत्या केली आहे. आत्महत्येची चर्चा परिसरात पुन्हा रंगली आहे. कुपवाड पोलिस ठाण्यात मात्र आत्महत्येनंतर तक्रार नोंद नसल्याचे सांगण्यात आले. तसेच आतापर्यंत कोणी तक्रार करण्यास पुढे आले नसल्याचेही पोलिसांनी स्पष्ट केले.

अपहरण केल्याची तक्रार
इचलकरंजी एलसीबीच्या पथकाने गुरुवारी रात्री नगरकर आणि इतरांना ताब्यात घेतल्यानंतर कुपवाड पोलिसांना याची माहितीच दिली नाही. त्यामुळे कुपवाड पोलिस अंधारात होते. तेव्हा नगरकर याच्या नातेवाईकांनी कुपवाड पोलिस ठाणे गाठून अपहरण केल्याची खोटी तक्रार सांगितली. कुपवाड पोलिसांनी चौकशी केल्यानंतर खूनप्रकरणात ताब्यात घेतल्याची माहिती पुढे आली.

Web Title: sangli news Police son's murder for transfer of suicide