पोलिसांच्या बदल्यांसाठी वशिल्याच्या चिठ्ठ्या

बलराज पवार
रविवार, 20 मे 2018

सांगली - सध्या पोलिसांच्या बदल्यांचा हंगाम सुरु असून त्यासाठी बदलीस पात्र पोलिसांच्या मुलाखती घेण्याचे काम सुरु आहे. त्याचबरोबर नेत्यांच्या मर्जीतील पोलिसांच्या वशिल्याच्या बदलीसाठी चिठ्ठ्याही येवू लागल्याची चर्चा आहे. मात्र पोलिस अधीक्षक सुहेल शर्मा यांचा धाक पाहता चिठ्‌ठीवर बदली होईलच याची खात्री पोलिसांनाही नाही.

सांगली - सध्या पोलिसांच्या बदल्यांचा हंगाम सुरु असून त्यासाठी बदलीस पात्र पोलिसांच्या मुलाखती घेण्याचे काम सुरु आहे. त्याचबरोबर नेत्यांच्या मर्जीतील पोलिसांच्या वशिल्याच्या बदलीसाठी चिठ्ठ्याही येवू लागल्याची चर्चा आहे. मात्र पोलिस अधीक्षक सुहेल शर्मा यांचा धाक पाहता चिठ्‌ठीवर बदली होईलच याची खात्री पोलिसांनाही नाही.

दरवर्षी मेमध्ये जिल्ह्यात बदल्यांचा हंगाम सुरु होतो. अधीक्षक
सुहेल शर्मा यांनी गेल्या आठवड्यात 185 पोलिसांच्या प्रशासकीय बदल्या केल्या आहेत. एका पोलिस ठाण्यात सलग पाच वर्ष काम केलेल्या कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या. त्यावरही काहीजण नाराज आहेत. त्यांनी बदली थांबवण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत. आपल्या जवळच्या नेत्याला गळ घालून इच्छित ठिकाणी बदली किंवा बदली रद्दसाठी वशिला लावण्याचे काम सुरु झाले आहे. नेत्यांनीही मर्जीतल्या पोलिसासाठी वशिला
लावण्याचा प्रयत्न चालवला आहे.

काहींनी थेट बोलून तर काहींनी चिठ्‌ठी पाठवून काम करण्याचे प्रयत्न सुरु केले आहेत. आता विनंती बदल्या करण्यात येत आहेत. कार्यकाल पुर्ण झाला नसला तरी काही अडचणींमुळे ज्यांना बदली हवी आहे, त्यांच्या विनंतीनुसार बदली देण्याचा प्रयत्न आहे. यामुळे वशिल्याची चिठ्‌ठी येण्याची गरज नाही. त्यासाठी इच्छूकांच्या मुलाखती घेण्याचे काम सुरु आहे. उद्यापर्यंत या मुलाखती होणार आहेत.

पोलिस मुख्यालयात अधीक्षक सुहेल शर्मा यांनी मुलाखती घेतल्या. यावेळी त्यांनी कशासाठी बदली, काय अडचण आहे, विनंतीचे ठाणेच का पाहिजे, ते सोडून दुसरे ठाणे सांगा अशा प्रश्‍नांनी कर्मचाऱ्यांची फिरकीही घेतली. यावेळी मुख्यालयात मुलाखतीसाठी इच्छूकांची मोठी गर्दी झाली होती.

यंदाही हाच प्रकार

शिक्षकांच्या आणि पोलिसांच्या बदल्या हा मोठा चर्चेचा विषय असतो. त्यांच्या बदल्या बहुतेकवेळा प्रशासकीय कारणास्तव कमी आणि विनंती कमवशिल्यानेच होण्याचे प्रमाण जास्त आहे. अनेकवेळा अधिकाऱ्यांनी बदल्या केल्या की नेत्यांचा वशिला लावण्याचे काम सुरु होते. आता आधीच फिल्डींग
लावून नेत्याला गळ घालून बदलीची यादी जाहीर होण्यापुर्वीच वशिल्याची चिठ्‌ठी पाठवली जाते. यंदाही असा वशिल्यांचा प्रकार सुरु आहेच.

Web Title: Sangli News Police transfer issue