पोस्ट ऑफिस पासपोर्ट केंद्राचे शनिवारी उद्‌घाटन

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 9 मार्च 2018

सांगली: परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाच्या मंजुरीनुसार मंजूर झालेले पोस्ट ऑफिस पासपोर्ट सेवा केंद्र शनिवार (ता. 10) पासून सुरू होणार आहे. परराष्ट्र सचिव ज्ञानेश्‍वर मुळे यांच्या उपस्थितीत उद्‌घाटन होणार आहे. नागरिकांसाठी www. passportindia.gov.inह्या संकेतस्थळावरून पूर्वनोंदणी करण्यास आज प्रारंभ झाला आहे, अशी माहिती खासदार संजय पाटील यांनी दिली. अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेली ही मागणी पूर्ण केल्याबद्दल त्यांनी केंद्रीय परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज ह्यांचे आभार मानत श्री. पाटील यांनी पासपोर्ट सेवा केंद्र सुरू झाल्यामुळे जिल्हा, परिसरातील नागरिकांची सोय होणार आहे, असे सांगितले.

दरम्यान, राजवाडा चौकातील सांगली पोस्ट ऑफिस येथे पहिल्या मजल्यावर हे केंद्र सुरू होईल. ऑनलाईन नोंदणीची सुरवात पासपोर्ट विभागाच्या वेबसाईटवर आजपासून सुरू झाली, असे पासपोर्ट अधिकारी (पुणे) जयंत वैशंपायन कळवले आहे. सांगलीतील केंद्रात ऑनलाईन नोंदणी केलेल्या नागरिकांनाच येथे सेवा पुरवली जाणार आहे. पुणे विभागातील कोणताही नागरिक ह्या केंद्रातील सुविधेचा लाभ घेऊ शकतो. पुढील सूचना येईपर्यंत तत्काल पासपोर्टची सुविधा सांगली केंद्रात दिली जाणार नाही, असेही श्री. वैशंपायन यांनी कळवले आहे.

Web Title: sangli news post office passport center