दांडीबहाद्दर फैलावर, बैठकीवर बहिष्कार

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 28 जून 2017

सांगली - प्रभाग समितीच्या दोनच्या बैठकीस आज प्रमुख अधिकाऱ्यांनीच दांडी मारल्याने संतप्त सभापती अंजना कुंडले व नगरसेवकांनी सभागृह सोडत पालिकेतील छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याजवळ ठिय्या मारला. प्रशासनाचा निषेध नोंदवत घोषणा दिल्या. तीन महिन्यानंतर होत असलेल्या बैठकीबाबत आधी सदस्यांना गांभीर्य नाही. तोच कित्ता अधिकाऱ्यांनीही गिरवला. अधिकारी सभागृहात आल्यानंतर बैठक पुढे सुरू झाली.

सांगली - प्रभाग समितीच्या दोनच्या बैठकीस आज प्रमुख अधिकाऱ्यांनीच दांडी मारल्याने संतप्त सभापती अंजना कुंडले व नगरसेवकांनी सभागृह सोडत पालिकेतील छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याजवळ ठिय्या मारला. प्रशासनाचा निषेध नोंदवत घोषणा दिल्या. तीन महिन्यानंतर होत असलेल्या बैठकीबाबत आधी सदस्यांना गांभीर्य नाही. तोच कित्ता अधिकाऱ्यांनीही गिरवला. अधिकारी सभागृहात आल्यानंतर बैठक पुढे सुरू झाली.

या बैठकीत ड्रेनेज चरी बुजवणे, गटारांची साफसफाई, खड्डे बुजवणे असे विषय चर्चेत आले.  महापालिका क्षेत्राची चार प्रभाग समित्यांत विभागणी झाली आहे. गल्लीतील गटारी, साफ सफाई, नागरिकांच्या वैयक्तिक तक्रारी प्रशासनापर्यंत पोहोचवणे, त्याची तड लावणे या हेतूने या समित्यांची स्थापना आणि दरमहा बैठका होतात. महासभेत धोरणात्मक बाबीवर चर्चा व्हावी. गटार-झाडलोटीवर नव्हे. मात्र अलीकडे महासभांना प्रभाग समित्यांच्या बैठकांचे स्वरूप आले आहे. या समित्या आणि निवडी राजकीय प्रतिष्ठेचे खेळणे ठरल्यात. प्रशासकीय अधिकारीही चार-सहा महिन्यातून होणाऱ्या बैठकांकडे उपचार म्हणून पाहतात. तेच आज झाले. सर्व सदस्यांना पत्रे पोहोचली, मात्र अधिकारीच फिरकले नाही. साडेदहापासून सभापती, नगरसेवक अधिकाऱ्यांची प्रतीक्षा करीत होते. आरोग्य अधिकारी डॉ. सुनील आंबोळे रजेवर गेले होते. बांधकाम, ड्रेनेज, पाणी पुरवठा विभागाच्या प्रमुखांनी दांडी मारली. ज्यांच्याशी संबंधित प्रश्‍न तेच हजर नसतील तर बैठक कशाला घ्या असा प्रश्‍न सर्वांना पडला. अखेर अर्धा तास वाट पाहून सर्वांनीच कार्यालय सोडले. आवारात येत घोषणाबाजी केली. शिवपुतळ्याजवळ ठिय्या मारला. घोषणा दिल्या. नगरसेवकांनी घेतलेला रुद्रावतार अधिकाऱ्यांच्या कानी गेला असावा त्यानंतर एकापाठोपाठ एक अधिकारी स्थायी सभागृहात दाखल झाले. त्यानंतर बैठक सुरू झाली.

बैठकीतील चर्चेत युवराज बावडेकर, बाळासाहेब गोंधळे, दिग्वजय सूर्यवंशी, स्नेहल सावंत, राजू गवळी, महेंद्र सावंत, युवराज गायकवाड, अश्‍विनी खंडागळे, प्रियंका बंडगर यांनी भाग घेतला.

चरीचे नियोजन नाही
ड्रेनेज कामांसाठी खोदलेल्या रस्त्यासाठी चरी बुजवण्याची मागणी अनेक प्रभागात आहे. त्यासाठी ४० लाख रुपयांचा ठेका दिल्याची माहितीही देण्यात आली. मात्र ही कामे प्राधान्याने करण्याबाबत ठेकेदाराने कोणतेही नियोजन केलेले नाही. ठेकेदाराने मोघमात ही कामे करायची असेच धोरण असल्याचे स्पष्ट झाले. ठेकेदाराकडून या चरी योग्यरित्या बुजवल्या जात आहेत अथवा नाहीत याची देखरेखही अधिकाऱ्यांनी केलेली नाही. आंधळे दळते आणि कुत्रे पीठ खाते अशी स्थिती आहे.

Web Title: sangli news prabhag meeting