विटा नगरपालिकेेच्‍या उपनगराध्यक्षपदी प्रतिभा चोथे

प्रताप मेटकरी
रविवार, 7 जानेवारी 2018

विटा -  नगरपालिकेेच्‍या उपनगराध्यक्षपदी प्रतिभा अविनाश चोथे यांची बिनविरोध निवड झाली. या निवडीनंतर त्यांच्या समर्थकांनी फटाक्यांची आतिषबाजी करत आनंदोत्सव साजरा केला.

विटा -  नगरपालिकेेच्‍या उपनगराध्यक्षपदी प्रतिभा अविनाश चोथे यांची बिनविरोध निवड झाली. या निवडीनंतर त्यांच्या समर्थकांनी फटाक्यांची आतिषबाजी करत आनंदोत्सव साजरा केला.

विटा शहराच्या राजकीय वर्तुळात महत्वाची भूमिका असलेल्या देवांग समाजाला या टर्ममध्ये सलग दुसऱ्यांदा उपनगराध्यक्ष पदाची संधी मिळाली आहे. नगराध्यक्ष म्हणून प्रतिभा पाटील तर उपनगराध्यक्षा म्हणून प्रतिभा चोथे यांच्या रूपाने प्रथमच महिलांकडे पालिका कारभाराची सूत्रे आल्याने विटा पालिकेवर खऱ्या अर्थाने "महिलाराज" अवतरले असून "प्रतिभा"राज सुरु झाले आहे.

प्रतिभा चोथे या देवांग समाजातील पहिल्या महिला उपनगराध्यक्षा ठरल्या आहेत. त्यांनी यापूर्वी महिला बालकल्याण समिती, शिक्षण समिती, आरोग्य समिती आणि पाणीपुरवठा समितीच्या सभापती पदाच्या धुरा सांभाळली आहे. नगरसेविका पदाची त्यांची यंदाची दुसरी टर्म असून त्या प्रभाग दोन मधून निवडून आल्या आहेत.   

विटा नगरपालिकेेचे उपनगराध्यक्ष किरण तारळेकर यांनी पक्षांतर्गत निर्धारित  कालावधी पूर्ण झाल्यामुळे राजीनामा दिला होता. त्यामुळे उपनगराध्यक्ष पद रिक्त झाले होते. रिक्त असणाऱ्या उपनगराध्यक्ष पदाच्या निवडीसाठी पालिकेच्या लोकनेते हणमंतराव पाटील सभागृहात नगराध्यक्षा प्रतिभा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली विशेष बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी उपनगराध्यक्षपदासाठी सत्ताधारी गटाकडून प्रतिभा चोथे यांचाच एकमेव अर्ज दाखल झाला. त्यामुळे प्रतिभा चोथे यांची बिनविरोध निवड झाल्याचे नगराध्यक्षा प्रतिभा पाटील यांनी जाहीर केले. या निवडीनंतर नूतन उपनगराध्यक्षा प्रतिभा चोथे यांचा सत्कार झाला.        

माजी आमदार सदाशिवराव पाटील, माजी नगराध्यक्ष वैभव पाटील यांच्या नेतृत्वाखाली आणि नगराध्यक्षा प्रतिभा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली विटा नगरपालिकेचा कारभार पारदर्शक आणि लोकाभिमुख करण्यासाठी प्रयत्नशील राहीन. उपनगराध्यक्षा पदाच्या माध्यमातून सर्वांगीण विकासाच्या नाविन्यपूर्ण योजना प्रभावीपणे राबवून विटा पालिकेला राज्यात अग्रेसर ठेवण्याच्यादृष्टीने कार्यरत राहीन.
-  प्रतिभा चोथे,
उपनगराध्यक्षा

माजी आमदार अॅड. सदाशिवराव पाटील, माजी नगराध्यक्ष अॅड. वैभव पाटील, मुख्याधिकारी महेश रोकडे, जेष्ठ नेते गंगाधर लकडे, दत्तोपंत चोथे, विश्वनाथ कांबळे, विलास कदम, बाबुराव म्हेत्रे, दिलीप टेके, बी. आर. पाटील, माजी मावळते उपनगराध्यक्ष किरण तारळेकर, नगरसेविका मनीषा शितोळे, मीनाक्षी पाटील, मालती कांबळे, आशा पाटील, रुपाली पाटील, सारिका सपकाळ, प्रगती कांबळे, नेहा डोंबे, सानिका दिवटे, नगरसेवक अनिल म. बाबर, सुभाष भिंगारदेवे, दहावीर शितोळे, अॅड. विजय जाधव, संजय तारळेकर, अरुण गायकवाड, महेश कदम, फिरोज तांबोळी, अजित गायकवाड, पद्मसिंह पाटील, मधुकर म्हेत्रे,  विपुल तारळेकर, गजानन निकम, प्रशांत कांबळे, पांडुरंग पवार उपस्थित होते.

 

Web Title: Sangli News Pratibha Chothhe as Vice President of Vita Municipal Corporation