पंतप्रधान मोदी भाषणापुरतेच जादूगार - लक्ष्मण वडले

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 4 सप्टेंबर 2017

सांगली - लोकसभा निवडणुकीपूर्वी देशात घराघरांत मोदींची जादू चालली, मात्र तीन वर्षांत त्यांचे वास्तव समोर आले आहे. ते भाषणापुरते जादूगार बनले आहेत, असा आरोप शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष लक्ष्मण वडले यांनी आज येथे केला. 

शेतकरी संघटनेचे नेते, माजी खासदार शरद जोशी यांच्या जयंतीनिमित्त आयोजित शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते. दैवज्ञ भवनात मेळावा झाला. किसानपुत्र आंदोलनचे मार्गदर्शक अमर हबीब, ‘क्रेडाई’चे अध्यक्ष विकास लागू, युवा प्रदेशाध्यक्ष प्रदीप पाटील, ॲड. प्रकाश जाधव, बाळासाहेब कुलकर्णी, शंकर गोडसे, शामराव देसाई विचारमंचावर होते.

श्री. वडले म्हणाले, ‘‘देशातील परिस्थिती बिकट आहे. शेतकऱ्यांचे हाल सुरू आहेत. मोदींनी फसवी भाषणे करून स्वप्ने दाखवली. नोटबंदीचा निर्णय फसल्याचे स्पष्टपणे समोर आले. पाचशे व हजारच्या ९९ टक्के नोटा बॅंकांत जमा झाल्या, मग काळा पैसा गेला कुठे? हा पैसा जमवण्याचा जुमला होता का, काँग्रेसने ६० वर्षांत जेवढे लुटले नाही तेवढे मोदींनी एका नोटबंदीत लुटले. हा नोटा बदलून देण्याचाच कार्यक्रम होता. उद्योजक, व्यापारी, नोकरदार नोटा बदलून घ्यायला रांगेत नव्हते, त्यांना कधी पैसे बदलून दिले. लाखो नोकऱ्या, उद्योग अडचणीत आणणारा हा निर्णय देशासाठी संकट घेऊन आला. देशाचा विकासदर घसरला. याविरुद्ध पुन्हा एकदा लढाई सुरू करावी लागेल. ती रस्त्यावर उतरून असेल, कायदेशीर असेल आणि राजकीयदेखील असेल. त्यासाठी तयार राहा.’’

श्री. हबीब म्हणाले,‘‘या देशाचे अर्थकारण कच्च्या पायावर उभे आहे. ते भक्कम करण्याची क्षमता शेतीतच आहे. त्यासाठी शेतीसाठीचे धोरण पूर्णपणे बदलावे लागेल. समूह शेतीला प्रोत्साहन दिले पाहिजे. गुंतवणुकीला प्राधान्य दिले पाहिजे.’’

Web Title: sangli news The Prime Minister is the speaker for the speech