मुख्यमंत्री बदलला तरीही राज्यात सत्तांतर - पृथ्वीराज चव्हाण

बलराज पवार
शुक्रवार, 27 जुलै 2018

सांगली - जाहिरातबाजीत अडकलेले केंद्र आणि राज्यातील सरकार सर्व पातळ्यांवर अपयशी ठरल्याने आता राज्यात सत्तांतर अटळच आहे. मुख्यमंत्री बदलाची मलमपट्टी उपयोगाची नाही,  अशी टीका माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी येथे केली.

सांगली - जाहिरातबाजीत अडकलेले केंद्र आणि राज्यातील सरकार सर्व पातळ्यांवर अपयशी ठरल्याने आता राज्यात सत्तांतर अटळच आहे. मुख्यमंत्री बदलाची मलमपट्टी उपयोगाची नाही,  अशी टीका माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी येथे केली.

हरिपूरमधील रामकृष्ण वाटिका येथे कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस आघाडीच्या जाहीरनाम्याच्या प्रकाशनप्रसंगी ते बोलत होते. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, आमदार विश्वजीत कदम, जयश्री पाटील, माजी केंद्रीय राज्यमंत्री प्रतिक
पाटील, पृथ्वीराज पाटील, संजय बजाज, सुरेश पाटील, श्रीनिवास पाटील आदी उपस्थित होते. यावेळी नेत्यांनी पालिका क्षेत्रातील डॉक्‍टर, वकील, व्यापारी, उद्योजक यांच्याशी खुला संवाद साधला.

श्री चव्हाण म्हणाले, "" देवेंद्र फडणवीस गेल्या वीस वर्षातील
संख्याबळाच्या दृष्टीने "पॉवरफुल्ल मुख्यमंत्री' आहेत. कारण त्यांना एकहाती सत्ता मिळाली आहे. युती नाममात्र आहे. शिवसेनेची अवस्था रोजच्या कुरबुरीतून दिसते. तरीही त्यांचे सरकार सर्वच पातळ्यांवर अपयशी ठरले आहे. मिळालेल्या चांगल्या जनाधाराचा काहीच उपयोग झाला नाही. त्यामुळे
लोकांमध्ये विश्‍वासघात झाल्याची भावना आहे. म्हणून राज्यात नेतृत्व बदलाची भाषा सुरु आहे. ती शिवसेनेने सुरु केली. भाजपचे अध्यक्ष अमित शहा आणि शिवसेनेचे कार्याध्यक्ष उध्दव ठाकरे यांच्या भेटीत काय झाले माहिती नाही, पण त्यानंतर नेतृत्व बदलाची चर्चा सुरु झाली आहे. त्यामुळे
सरकारच्या शेवटच्या काळता मुख्यमंत्री बदलला तरीही येणाऱ्या विधानसभा निवडणूकीत राज्यात परिर्वतन अटळ आहे.''

ते म्हणाले, "" शेतकरी आत्महत्या, बेरोजगारी वाढली आहे. मराठा आरक्षणाच्या आंदोलनामागची ही कारणे आहेत. हे आंदोलन त्यांना संवेदनशीलतेने हाताळता आले नाही. बेजबाबदार वक्तव्ये करीत मंत्री आगीत तेल ओतत आहेत. व्यापारी, उद्योजक, शेतकरी, सामान्य माणूस कोणीच या
सरकारवर समाधानी नाही. त्यामुळे सरकार, प्रशासन चालवण्याचा अनुभव असेल त्यांच्या हाती सत्ता द्या. आम्ही महापालिकेला महाराष्ट्रातील एक आदर्श शहर बनवण्याचा प्रयत्न करु.''

एक ऑगस्टला "त्या' आठवणी ठेवा'
राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले,"" जीएसटी आणि नोटाबंदी नंतर व्यापारी, उद्योजकांना किती त्रास झाला याची आठवण एक ऑगस्टला ठेवा. हा त्रास भाजपमुळे झालेला आहे हे लक्षात ठेवून व्यापारी, उद्योजकांनी मतदान करावे.''


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sangli News Prithviraj Chavan comment