सदाभाऊंमुळे मंत्रिपद हुकणार नाही - पृथ्वीराज देशमुख

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 10 एप्रिल 2018

सांगली - कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत भाजपच्या राज्याच्या कोट्यातून आमदार आणि मंत्री  झाले आहेत. ते भाजपचे आहेत, हे आम्ही मागेच स्वीकारले आहे. परंतु पक्षाने त्यांना मंत्री केले म्हणजे सांगलीला मंत्रिपदाची संधी हुकणार नाही. सदाभाऊ हे राज्य पातळीवरचे नेते आहेत. सांगलीसाठी वेगळे  मंत्रिपद भाजपला द्यावे लागेल, अशी भूमिका जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख यांनी ‘सकाळ’शी बोलताना मांडली.

सदाभाऊंनी रविवारी ‘मी कधीच भाजप प्रवेश केलाय’, असा गौप्यस्फोट करून खळबळ उडवून दिली. त्यानंतर जिल्हा भाजपच्या गोटात काय प्रतिक्रिया उमटतात,  याकडे लक्ष होते. विशेषतः चार आमदार, एक खासदार या जिल्ह्याने दिला तरी मंत्रिपदाचा दुष्काळ कायम असल्याची ओरड होते. अशावेळी सदाभाऊ भाजपचे असतील तर त्या ओरडण्यातील हवा निघून जाण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. त्या पार्श्‍वभूमीवर  जिल्हाध्यक्ष देशमुख यांनी सदाभाऊंचे स्वागत करतानाच भाजपचा मंत्रिपदाचा दुष्काळ कायम राहू नये, अशी खबरदारी घेणारी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. 

श्री. देशमुख म्हणाले,‘‘सदाभाऊंचे भाजपमध्ये आम्ही स्वागतच करतो. अर्थात त्यांच्या भाजप प्रवेशाची माहिती आमच्यासाठी नवी नाही. 

गेल्या आठवड्यात पालकमंत्री सुभाष देशमुख यांच्या उपस्थितीत पक्षाची बैठक झाली. त्याला सदाभाऊ हजर होतेच की. सदाभाऊंच्या पक्षात असण्याचा आम्हाला फायदाच होणार आहे. त्यांना राज्य कोट्यातून आमदार व मंत्रिपद मिळाले आहे. आम्ही जिल्ह्यात मंत्रिपदाची अपेक्षा करतोय आणि ती संधी मिळेल, याबद्दल शंका वाटत नाही.’’

सांगलीचे आमदार, शहर जिल्हाध्यक्ष सुधीर गाडगीळ म्हणाले,‘‘भाजपच्या वाढीसाठी पक्षात सर्वांचे आम्ही स्वागतच करतो.’’

Web Title: Sangli News Pruthviraj Deshmukh Comment