२५०० रुपये दर म्हणजे शेतकऱ्यांवर दिवसा टाकलेला दरोडा - रघुनाथदादा पाटील

विजय पाटील
सोमवार, 5 मार्च 2018

सांगली - उसाला कायदेशीर एफआरपी द्या, अन्यथा कारखान्यातुन साखर बाहेर पडू देणार नाही, असा इशारा शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथदादा पाटील यांनी दिला आहे. 

सांगली - उसाला कायदेशीर एफआरपी द्या, अन्यथा कारखान्यातुन साखर बाहेर पडू देणार नाही, असा इशारा शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथ दादा पाटील यांनी दिला आहे.  साखरेचे दर लक्षात घेत तीन हजार रुपये दर मिळाला पाहिजे. २५०० रुपये दर म्हणजे शेतकऱ्यांवर दिवसा टाकलेला दरोडा आहे अशी टीकाही श्री. पाटील यांनी केली. 

श्री. पाटील म्हणाले की ऊस पट्ट्यामध्ये शेतकऱ्यांसाठी असंतोषाचे वातावरण आहे. १४ दिवसात एफआरपी देणे बंधनकारक आहे. पण आता एफआरपीही देण्यासाठी कारखाने टाळाटाळ करत आहेत. खताचे, पाण्याचे दर वाढले आहेत. वाढत्या महागाईमुळे ऊस शेती परवडणे शक्य नाही. यासाठी उसाला योग्य भाव मिळायलाच हवा. दर न देणाऱ्या साखर कारखानदारां विरोधात साखर आयुक्तांनी नोटीसा काढल्या आहेत. पण कारवाई करणे हे जिल्हाधिकाऱ्यांचे काम आहे. यासाठी आम्ही जिल्ह्याधिकाऱ्यांना भेटून कारवाई करावी असे आवाहन आम्ही करणार आहोत. कारवाई झाली नाही तर आम्ही साखर बाहेर पडू देणार नाही.असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.  

 

Web Title: Sangli News Raghunanth Dada Comment