तासगावातील कॅसिनो जुगार अड्ड्यावर छापा

बलराज पवार
रविवार, 22 जुलै 2018

सांगली - तासगाव शहरातील आर्या व्हिडिओ गेम येथे कॅसिनो जुगार अड्ड्यावर विशेष पोलिस पथकाने छापा टाकला. या छाप्यात 68 हजाराचा मुद्देमाल जप्त केला तसेच या ठिकाणी जुगार खेळणाऱ्या चौघांना अटक केली. त्यांच्यावर तासगाव पोलिस ठाण्यात जुगार अधिनियम कलम 4 व 5 नुसार कारवाई करण्यात आली.

याबाबत अधिक माहिती अशी, तासगाव शहरात मार्केट यार्डजवळच्या युनियन बॅंकेसमोर आर्या व्हिडिओ गेम नावाचे सेंटर एका दुकान गाळ्यात सुरु आहे. तेथे कॅसिनो नावाचा जुगार खेळला जात असल्याची माहिती विशेष पोलिस पथकाचे सहायक पोलिस निरीक्षक संतोष डोके यांना मिळाली. त्यांनी पथकासह सदरच्या व्हिडिओ गेम सेंटरवर छापा टाकला.

यावेळी तेथे सेंटरचा मालक ओंकार रविंद्र चव्हाण (गिळे, वय 41 रा. ढवळवेस तासगाव) याच्यासह कामगार अमोल महादेव वाघमारे (वय 30, रा. मार्केड यार्ड तासगाव) आणि दोघेजण जुगार खेळताना सापडले. बाबा आनंदा जावळे (वय 28, रा. इंदिरानगर, तासगाव) आणि विवेक ज्ञानेश्‍वर जाधव (वय 39, रा. कासार गल्ली, तासगाव) हे दोघे तेथे कॅसिनो जुगार खेळत होते.

विशेष पथकाने चौघांना ताब्यात घेऊन कारवाई केली. तसेच या कॅसिनोमधील तीन संगणक, मोबाई, टीपी लिंक राऊटर असा 68 हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई अधीक्षक सुहेल शर्मा आणि अपर अधीक्षक शशिकांत बोराटे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक संतोष डोके, मारुती मोरे, दिपक ठोंबरे, मुदस्सर पाथरवट, अरुण पाटील, सचिन जाधव, सुहिल कारतियानी, गौतम कांबळे, वनिता चव्हाण, प्रियांका धुमाळ, बजरंग शिरतोडे, संदीप नलवडे यांच्या पथकाने केली.

Web Title: Sangli News raid on Casino Gambling in Tasgaon