आष्ट्यातील सिद्धी लॉजवर छापा

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 19 मार्च 2018

सांगली - आष्टा येथील सिद्धी लॉज येथे सुरू असलेला वेश्‍याव्यवसाय स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने छापा टाकून बंद पाडला. त्यानंतर तेथे दुपारी छापा टाकून मालकासह तिघांना पोलिसांनी अटक केली; तर एका पीडित अल्पवयीन मुलीची सुटका केली. 

सांगली - आष्टा येथील सिद्धी लॉज येथे सुरू असलेला वेश्‍याव्यवसाय स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने छापा टाकून बंद पाडला. त्यानंतर तेथे दुपारी छापा टाकून मालकासह तिघांना पोलिसांनी अटक केली; तर एका पीडित अल्पवयीन मुलीची सुटका केली. 

लॉजचा मालक सचिन हरिश्‍चंद्र माने (वय ३८, रा. लक्ष्मीबाई नायकवडीनगर, आष्टा), व्यवस्थापक तुकाराम पांडुरंग गावडे (४०, रा. चव्हाण कॉलनी, आष्टा) आणि रूमबॉय छोटू जंबाजी पेटारे (२३, रा. आनंद कॉलनी, डांगे कॉलेजनजीक, आष्टा) यांना अटक केली. 

इस्लामपूर रस्त्यावरील सिद्धी लॉज येथे वेश्‍याव्यवसाय सुरू असल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेस मिळाली होती. तसेच, तेथे वेश्‍या व्यवसायासाठी अल्पवयीन मुलींचा पुरवठा करण्यात येत असल्याचेही त्यांना समजले होते. त्यानुसार काल (ता. १७) रात्री लॉजवर छापा टाकण्यात आला. अचानक छापा पडल्याचे समजताच लॉजमध्ये खळबळ उडाली. मात्र, पोलिसांनी मालकासह तिघांना अटक केली. लॉजची झडती घेऊन एका पीडित मुलीची सुटका करण्यात आली. तिघांवरही अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंधक कायदा तसेच लैगिंक अत्याचारापासून बालकांचे संरक्षण अधिनियमानुसार गुन्हा दाखल झाला.

निरीक्षक राजन माने यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाईत उपनिरीक्षक शिल्पा यमगेकर, सहायक पोलिस फौजदार भगवान नाडगे, हवालदार विकास पाटणकर, लता गावडे, कविता पाटील, अभिजित गायकवाड, स्नेहल मोरे, चालक शरद कोळेकर आदी सहभागी झाले होते.

Web Title: Sangli News raid on Siddhi Lodge in Astha