बेदाणा दरवाढीचा दिलासा

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 24 जुलै 2017

सांगली - या सप्ताहात बेदाणा दरात चांगली वाढ झाल्याने शेतकऱ्यांना थोडासा दिलासा मिळाला. भाजी बाजारात पालेभाज्यांच्या दरात घसरण झाल्याने ग्राहकांना श्रावण महिन्यात मेथी, पालक, शेपूवर ताव मारण्याची संधी आहे. गवारी, वांगी आणि टोमॅटो भडकलेलाच आहे. 

बेदाणा दर १५० रुपयांवर जायला तयार नव्हता. सध्या बाजारात कृष्णजन्माष्टमीसाठी बेदाण्याला उठाव आहे. उत्तर भारतात मोठ्या प्रमाणात बेदाणा खरेदी होते. त्यामुळे दरात तेजी आली असून उत्तम दर्जाचा बेदाणा २०० रुपये किलोवर पोचला आहे.  

भाजीपाला बाजारातील तेजी कायम आहे. श्रावण महिन्यात मटण, मासे, चिकन, अंडी खायची नाहीत, असा कटाक्ष पाळणारे शाकाहारावर ताव मारतील. त्यामुळे भाजीपाल्याला उठाव चांगला असेल. दरातील तेजीचा परिणाम जाणवेल. पाऊस लांबल्याने भाजीपाला तुटवडा कायम आहे. हिरवी मिरची ८० रुपये, गवार ८० ते १००, दुधी भोपळा २० ते ३०, ढब्बू ३५ ते ४० रुपये, आले ८० रुपये,  टोमॅटो ६० रुपये, भेंडी ४० रुपये, वांगी ८० रुपये, दोडका ५० रुपये, कारले ६० रुपये, फ्लॉवर ६० रुपये, कांदा २०, लसूण ६० रुपये किलो आहे. कोथिंबीर, मेथी, शेपू १० रुपयांना पेंढी आहे. 

Web Title: sangli news raisin

टॅग्स