ऑनलाईन बेदाणा सौदांना सांगलीत प्रारंभ 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 22 ऑगस्ट 2017

सांगली - सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीची नामसाठी (नॅशनल ऍग्रिकल्चरल मार्केटिंग) निवड करण्यात आली आहे. यामध्ये बेदाण्याचे ई-ऑक्‍शन पद्धतीने सौदे काढले जाणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी नामच्या सौद्यांची आज माहिती घेणार होते. मात्र बीएसएनलची कनेक्‍टव्हीटी न मिळाल्याने प्रत्यक्षात दुकानाऐवजी बाजार समिती कार्यालयात सौदे काढावे लागले. ई-ऑक्‍शन सौद्यात 132 बॉक्‍सची विक्री झाली. किलोला सरासरी 100 ते 131 रुपये दर मिळाला. 

नाम योजनेंतर्गत राज्यातील 30 बाजार समित्या निवडल्या आहेत. त्यात सांगलीतील बेदाणा व आटपाडीतील डाळिंबाचे सौदे ई-ऑक्‍शन पद्धतीने करण्यासाठी निवड झाली आहे. ई-ऑक्‍शनद्वारे अंतर्गत ऑनलाईन सौदे काढण्यात येणार आहेत. पंतप्रधान मोदी स्वतः ई-ऑक्‍शन सौद्याची माहिती घेणार होते. त्यांनी संपूर्ण देशातील बाजार समित्यांमध्ये होणाऱ्या विविध मालांच्या सौद्यातील दराबाबतचा आढावा घेतला. 

बेदाण्याचे आजचे सौदे हॉलमध्ये काढण्यात येणार होते. खरेदीदार, अडते तेथे आले; मात्र बीएसएनएलची कनेक्‍टव्हिटी नसल्यामुळे सौदे हॉलऐवजी ऐनवेळी बाजार समिती मुख्यालयात काढाले. केंद्र सरकारच्या योजनेतून ई-ऑक्‍शन सुरू करण्यात आल्याने बीएसएनएलची इंटरनेट सुविधा वापरली जाते. मागील काही दिवसांपासून कनेक्‍टव्हिटीची अडचण निर्माण होत आहे. 

ई-ऑक्‍शनद्वारे सौद्यासाठी 20 खरेदीदार, 10 अडते आले होते. त्यात 132 बॉक्‍स बेदाणा आला होता. यापैकी सात प्लॉटचे सौदे काढले. बेदाण्यास सरासरी 100 ते 131 रुपये किलो दर मिळाला. सभापती प्रशांत शेजाळ, सचिव पी. एस. पाटील, सहायक सचिव एन. एम. हुल्याळकर उपस्थित होते.

Web Title: sangli news raisin