वसंतदादा स्मारकाच्या निधीसाठी मुख्यमंत्र्यांशी बोलणार - राज ठाकरे  

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 14 जानेवारी 2018

सांगली - माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त राज्य सरकारने केवळ समिती स्थापनेचा सोपस्कार पार पाडला. त्याशिवाय काहीच काम झाले नाही. सांगलीतील त्यांच्या स्मारकाच्या निधीचा प्रश्‍नही लटकला आहे. या प्रकरणी मी स्वतः मुख्यमंत्र्यांना तातडीने बोलेन, असे मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज सांगितले. 

औदुंबर येथील साहित्य संमलेनाच्या निमित्ताने सांगली दौऱ्यावर असलेल्या राज यांनी सकाळी वसंतदादांच्या स्मारकाचे दर्शन घेतले. माजी केंद्रीय राज्यमंत्री प्रतीक पाटील, वसंतदादा कारखान्याचे अध्यक्ष विशाल पाटील, माजी आमदार नितीन शिंदे, अॅड. स्वाती शिंदे  आदी उपस्थित होते. त्यावेळी प्रतीक यांनी वसंतदादा स्मारकाविषयी माहिती दिली. यंदा दादांचे जन्मशताब्दी वर्ष आहे. त्यानिमित्त सांगलीत घेतलेल्या उपक्रमांची माहिती दिली. राज यांनी दादांच्या जन्मशताब्दीनिमित्त राज्य सरकारकडून काही कार्यक्रम झाले नाहीत आणि स्मारकाच्या निधीचाही प्रश्‍न कानी आला आहे, मी मुख्यमंत्र्यांशी बोलेन, असे सांगितले. मनसेच्या स्थानिक नेत्यांनी याची माहिती दिली, असेही त्यांनी सांगितले. 

Web Title: Sangli News Raj Thakare comment