स्वाभिमानी सांगली पालिकेत मोजक्‍या जागा लढणार - राजू शेट्टी

अजित झळके
शुक्रवार, 22 जून 2018

सांगली -  स्वाभिमानी शेतकरी संघटना सांगली, मिरज, कुपवाड महापालिकेच्या निवडणुकीत मोजक्‍या जागा ताकदीने लढणार असल्याची माहिती खासदार राजू शेट्टी यांनी पत्रकार परिषदेत दिली.  

सांगली -  स्वाभिमानी शेतकरी संघटना सांगली, मिरज, कुपवाड महापालिकेच्या निवडणुकीत मोजक्‍या जागा ताकदीने लढणार असल्याची माहिती खासदार राजू शेट्टी यांनी पत्रकार परिषदेत दिली.  

"स्वाभिमानी'ने आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुकांमध्ये पाच जिल्ह्यात मशागत सुरु केली आहे. त्यात कोल्हापूर, सांगली, बुलडाणा, वर्धा, सोलापूर जिल्ह्यांतील मोजक्‍या मतदार संघांचा समावेश आहे. तेथे भाजपविरुद्ध रान उठवायला सुरवात केली आहे. त्याआधी महापालिकेची निवडणूक होत आहे. या ठिकाणी संघटनेची ताकद मर्यादित असली तरी निवडणूक लढवण्याची कार्यकर्त्यांची मानसिकता आहे.

त्याबाबत विचारले असता श्री. शेट्टी म्हणाले, ""महापालिकेची निवडणूक लढवण्याची कार्यकर्त्यांनी तयारी केली आहे. काही इच्छुक उमेदवारांनी संपर्क साधला आहे. काही मोजक्‍या जागांवर आम्ही निश्‍चितपणे लढणार आहोत. आघाडी झाली तर काही हक्काच्या जागा घेऊन ताकद लावू.''

Web Title: Sangli News Raju Shetty comment