भाजप सरकार हे हिंदी चित्रपटातील मुनिमासारखे - शेट्टी

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 22 जुलै 2018

इस्लामपूर - भाजपचे सरकार हे हिंदी चित्रपटातील मुनिमासारखे आहे. तर रघुनाथदादा फार  मोठे विद्वान आणि सदाभाऊ खोत किरकोळ आहेत, असा टोला खासदार राजू शेट्टी यांनी  इस्लामपूर येथे लगावला. 

इस्लामपूर - भाजपचे सरकार हे हिंदी चित्रपटातील मुनिमासारखे आहे. तर रघुनाथदादा फार  मोठे विद्वान आणि सदाभाऊ खोत किरकोळ आहेत, असा टोला खासदार राजू शेट्टी यांनी  इस्लामपूर येथे लगावला. 

दूध दर आंदोलन यशस्वी केल्यानंतर खासदार राजू शेट्टी यांचे इस्लामपुरात जंगी स्वागत झाले. त्यावेळी ते बोलत होते. आंदोलनाचे श्रेय कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांचे समर्थक सोशल मीडियावरून घेत आहेत. याबाबत ते म्हणाले,‘‘सदाभाऊ खोत किरकोळ आहेत. किरकोळ माणसाचे माझ्यापुढे नावसुद्धा काढू नका.’’  

रघुनाथदादांनी शेट्टी यांच्या दूध संघाला सामील होऊन शेट्टी आंदोलन करतात या टीकेबाबत शेट्टींना विचारले असता ते म्हणाले,‘‘रघुनाथदादा फार विद्वान आहेत. त्यांनी आजपर्यंत मी कारखानदारांना, दूध संघवाल्यांना, काँग्रेस-राष्ट्रवादीला, भाजपलासुद्धा सामील असल्याचा आरोप केला आहे.’’

सध्याचे भाजपचे सरकार हे जुन्या हिंदी चित्रपटातील मुनीमजीसारखे आहे. हिंदी चित्रपटातील मुनीम जसा गोरगरीब शेतकरी, कष्टकरी, अशिक्षित लोकांचे अंगठे उठवून  घेऊन जमीनजुमला नावावर करीत होता, तसेच आपणास जसे पाहिजे तसे कागदावर लिहून लोकांची फसवणूक करायचा त्या प्रमाणेच सध्याच्या सरकारची कामगिरी सुरू आहे. आता या महालबाड सरकारच्या कमळावर येणाऱ्या निवडणुकीत कोणते तणनाशक मारायचे हे लोकांनीच ठरवावे. स्वाभिमानी शेतकरी संघटना सध्या सर्वपक्षीय लोकांच्यापासून समान अंतरावर आहे.’’

यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष सयाजी मोरे, जिल्हाध्यक्ष महेश खराडे, ॲड. एस. यु. संदे, आप्पासाहेब पाटील, राजाराम परीट आदी उपस्थित होते.

Web Title: Sangli News Raju Shetty comment