शैक्षणिक धोरणाविरोधात आज मोर्चा

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 20 जानेवारी 2018

सांगली - जिल्हा शैक्षणिक व्यासपीठातर्फे शैक्षणिक धोरणाविरोधात आणि विविध मागण्यांसाठी उद्या (ता. २०) जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून धरणे आंदोलन केले जाणार आहे.

राज्यात शिक्षण क्षेत्रात १७ वर्षांत अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. त्या सोडविण्यासाठी अनेकदा प्रयत्न करूनही शासनाने निर्णय घेतला नाही. उलट दिवसेंदिवस अनेक अशैक्षणिक निर्णय शासन घेत आहे. त्याचे अलीकडचे उदाहरण म्हणजे दहा ते वीस पटाच्या आतील शाळा बंद करणे. शिक्षण क्षेत्रातील विविध प्रलंबित समस्या शासनाने सोडवाव्यात म्हणून जिल्हा शैक्षणिक व्यासपीठाने घंटानाद आंदोलन केले. 

पुणे आयुक्त कार्यालयावर मोर्चा काढला. झोपमोड आंदोलन केले. नागपूर अधिवेशनावर मोर्चा काढला. तेव्हा शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी विद्यार्थी व पालक हिताचे निर्णय घेण्याचे आश्‍वासन दिले. परंतु आजतागायत निर्णय घेतले नाहीत. त्यामुळे शासनाच्या धोरणाविरोधात लढा देण्याचा निर्णय 
सर्व संघटनांच्या पुणे, नाशिक, कोल्हापूर, सातारा येथील शिक्षण बचाव कृती समितीच्या बैठकीत घेतला. त्यानुसार उद्या दुपारी एकला विश्रामबाग येथील क्रांतिसिंह नाना पाटील पुतळ्यासमोरून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला जाणार आहे. त्यानंतर धरणे आंदोलन केले जाईल. मोर्चात विविध शिक्षक संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी 
होणार आहेत.

Web Title: sangli news rally oppose to education policy