तासगाव तालुक्यात आठ महिन्याच्या गर्भवतीवर सामुहिक बलात्कार

तासगाव तालुक्यात आठ महिन्याच्या गर्भवतीवर सामुहिक बलात्कार

सांगली -  तासगाव तालुक्यात आठ महिन्याच्या गर्भवतीवर तुरची फाटा येथे सामुहिक बलात्कार झाल्याची घटना घडली आहे. पतीला मोटारीमध्ये डांबून हे कृत्य आठ नराधमांनी केले आहे. या प्रकरणी तासगाव पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.

याबाबत तासगाव पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की ही पिडीत महिला माण तालुक्यातील आहे. ती पतीसह हॉटेल व्यवसाय करते. त्यांच्या हॉटेलमध्ये कामासाठी एक विवाहित जोडपे हवे होते. याचा शोध ते घेत होते. दरम्यान मुकुंद माने याने महिलेच्या पतीला फोन करुन तुरची फाटा येथे एक जोडपे आहे. वीस हजार रुपये आगाऊ रक्कम देण्यासाठी घेवून या, असे सांगून बोलावून घेतले.

मंगळवारी सायंकाळी पाच ते सहाच्या सुमारास हे पती-पत्नी तुरची फाटा येथील एका चाळीजवळ पैसे घेवून आले. आल्यानंतर मुंकुंद याने त्याच्या सोबत असलेल्या सागरला ‘यांना मारा’ असे सांगितल्यानंतर सागरने दोघांनाही प्लॅस्टिकच्या पाईपने मारहाण करण्यास सुरूवात केली. यानंतर पिडीत महिलेच्या गळ्यातील तीन तोळ्याचे सोन्याचे मंगळसूत्र, दीड तोळ्याची सोनसाखळी तसेच रोख 20 हजार काढून घेतले.

यानंतर दुचाकीवरुन आणखी चौघे त्याठिकाणी आले. महिलेच्या पतीला बाहेर उभ्या असलेल्या मोटारीमध्ये डांबून ठेवले. व महिलेला जबरदस्तीने ओढून तेथीलच एका खोलीमध्ये नेले. यावेळी पिडीतेवर जबरदस्ती करत असताना ‘मी आठ महिन्यांची गर्भवती आहे, मला सोडा’, अशी विनवणी केली. मात्र या सर्वांनी पिडीतेवर बलात्कार केला. 

यानंतर पतीला त्याठिकाणी आणून, ‘इथून गप निघून जायचे, पोलिसांत जावू नका, तुमचे कोणी ऐकणार नाही, मी इथलाच आहे’, असे सांगून दम दिला.

दरम्यान अधिक तपास सहायक पोलिस निरीक्षक उमेश दंडिले करीत आहेत.या प्रकाराने तासगाव तालुक्यात खळबळ उडाली आहे.

आरोपीचे नावे..

सागर, मुकुंद माने, जावेद खान, विनोद व अनोळखी चौघे (पूर्ण नावे, पत्ता समजू शकले नाही)  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com