शिराळ्यात दर नसल्याने मिरच्या, टोमॅटो फेकून देण्याची वेळ

शिवाजी चौगुले
गुरुवार, 28 जून 2018

शिराळा - भाजीपाल्याचे दर गडगडले आहेत. उत्पादन खर्चही निघत नसल्याने शेतकरी मिरच्या व टोमॅटो रस्त्यावर फेकत आहेत. तो माल जनावरे खात आहेत.

महागाई वाढली. पण मालाला दर नाही. व्यापारी कमी दराने भाजीपाला खरेदी करतो. जादा दराने विकून मालामाल होतो. शेतकरी मात्र कंगाल होत आहे.

टोमॅटो १२ रुपये, मिरची १५ रुपये, केळी ७ रुपये असा दर निघत आहे. उत्पादन खर्च शेतकऱ्यांच्या अंगावर बसत आहे. पावसाळा सुरू झाल्याने भाजीपाला खराब होतो. त्याचा फटका शेतकऱ्यांना बसतोय. दर कमी व माल खराब होत असल्याने शेतकरी टोमॅटो, मिरची रस्त्यावर फेकू लागला. मजुरांची कमतरता, त्यात  मजुरीची दरवाढ यामुळे प्लॉटधारक आर्थिक विवंचनेत सापडलेत.

दोन टन मिरच्या रस्त्यावर
एक एकरात मिरची लावली आहे. दलालाकडून बाजारात १५ रुपये किलोने मिरची खरेदी, मजूर कमतरता, पाऊस यामुळे मिरच्या पिकून कुजू लागल्या आहेत. पावसामुळे त्या वाळवता येत नाही. त्यामुळे जवळपास दोन टन मिरच्या रस्त्यावर टाकाव्या लागल्याने ८० हजारांचे नुकसान झाले आहे, असे शेतकरी रुपेश फोंडे यांनी सांगितले.

तीस गुंठ्यात टोमॅटो आहे. दलाल किलोला १२०  पर्यंत दर देतोय. व्यापारी २५ किलोच्या कॅरेटला दोन किलो तूट धरतो. सात रुपये किलोने केळी खरेदी करतो. मनमानीच सुरू आहे. नाईलाज म्हणून मेहनत करून पिकवलेला माल रस्त्यावर फेकतोय.
- विश्वास औताडे,
शेतकरी

Web Title: Sangli News rate issue of farm produce