झेंडूची फुले झाली मातीमोल

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 19 जुलै 2018

सांगली - मिरज पश्‍चिम आणि पूर्व भागात झेंडूची फुले गटारात फेकून देण्याची वेळ आली आहे. मुंबई दादर बाजारात झेंडूचा दर आठ रुपये किलोवर आला आहे. येथून फुलांचा वाहतूक करण्याचा खर्च सात रुपये प्रतिकिलो आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी फुले काढून गटारात फेकण्याचाच पर्याय निवडला आहे. आता श्रावण महिन्यातील बाजाराकडे डोळे लागले आहेत.

मिरज पश्‍चिम भागातील तुंग, समडोळी, कवठेपिरान या गावांत झेंडूचे उत्पादन अधिक आहे. मिरज पूर्व भागात मल्लेवाडी, टाकळी, एरंडोली, मालगाव आदी गावांत झेंडूचे पीक घेतले जात आहे. स्थानिक बाजारात फुलांना फारशी मागणी आहे. त्यामुळे मुंबई बाजारपेठेवरच सारे अवलंबून आहे. शेतकरी संघांच्या माध्यमातून ही फुले पाठवली जातात. 

सध्या मुंबईत धो धो पाऊस सुरू आहे. त्यामुळे झेंडूच्या फुलाला उठाव नाही. दर गडगडले आहेत. या स्थितीत शेतकऱ्यांकडे फुले तोडून गटारीत टाकण्याशिवाय पर्यायच नाही, असे उत्पादक विद्यासागर पाटील यांनी सांगितले.  हे पीक श्रावण महिन्यापर्यंत टिकू शकते, मात्र त्यावर करपा रोगाचा प्रादुर्भाव होण्याची भीती आहे. त्यामुळे  फुले शक्‍यतो लवकर तोडून गटारीत टाकली जात आहेत. 

तोडणी खर्चही अंगावर 
स्थानिक बाजारात स्थिती वाईट आहे. दररोजच्या मागणीपेक्षा १०० किलो फुले जास्त आली तरी दर १०-१२ रुपये किलोवर येतो. सध्या फुलांचा तोडा घेण्यासाठीचा कामगारांचा खर्चही शेतकऱ्यांच्या अंगावर बसतो आहे.

Web Title: Sangli News rate issue of marigold flowers