सांगलीत रस्त्यांची झाली चाळण

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 26 सप्टेंबर 2017

सांगली - शहरात एक जोराचा पाऊस झाला, की पार दाणादाण उडते, हे चित्र नवे नाही. ठिकठिकाणी पाण्याची साचलेली तळी आणि दलदल ही सांगलीकरांच्या पाचवीला पुजलेली आहे. पावसाळ्यापूर्वी मुख्य रस्त्यांसह उपनगरातील रस्त्यांचे पॅचवर्क व्हावे, यासाठी आंदोलने झाली. त्यानंतर प्रशासनाला जाग आली आणि पॅचवर्कचा देखावा केला.

रविवारच्या (ता. २४) जोराच्या पावसाने सारे पॅचवर्क वाहून गेले असून, रस्त्यांची पार दाणादाण उडाली आहे. कारभारी अन्‌ अधिकारी केवळ ठेकेदारांच्या मलईला सोकावल्यानेही सांगलीकर त्रस्त आहेत. 

गेल्या दोन वर्षांत अडीच कोटी रुपये खर्च पॅचवर्क कामावर झाला. एकूण चार वेळा सरासरी प्रत्येक प्रभाग समितीत पंधरा लाखांचा खर्च होत असून, ही सर्व लूट ठराविक ठेकेदार आणि अधिकाऱ्यांच्या संगनमताने सुरू आहे. यावर नियंत्रण ठेवणारी यंत्रणाच पालिका प्रशासनाकडे नाही. त्यामुळे रस्ते पुन्हा खड्डेमय झाले आहेत. शहरातील एकही रस्ता सध्या खड्डेमुक्त नाही. उपनगरांची अवस्था न बोललेलीच बरी, अशी गत आहे. 
कालच्या पावसाने शहरात ठिकठिकाणी पाण्याची तळी साचलीच; पण पॅचवर्क केलेली कामे वाहून गेली आहेत. आयुक्त-महापौर केवळ चौक सुशोभीकरण करण्यात धन्यता मानतात. रस्त्याची लागलेली वाट त्यांना दिसून येत नाही. त्याची झळ केवळ नागरिकांनाच सोसावी लागते आहे. मलईला सोकावलेले कारभारी आणि अधिकाऱ्यांना नागरिकांच्या प्रश्‍नांशी देणे-घेणे राहिलेले नाही. 

ठेकेदारांवर कारवाई का नाही..?
ड्रेनेजच्या कामातील दिरंगाई प्रशासनाच्या लक्षात आल्यानंतर संबंधित ठेकेदाराला आयुक्तांनी तब्बल ५० लाखांच्या दंडाची कारवाई केली. मात्र, पॅचवर्कच्या निकृष्ट कामाचे पुरावे समोर असूनही अद्याप कारवाई केली जात नाही. कारवाई झाली तर पुन्हा पॅचवर्कचा ‘देखावा’ पाहायला मिळणार नाही. 

Web Title: sangli news road damage