हरिपूरमध्ये दर्शनासाठी आलेल्या दांपत्यास चाकुचा धाक दाखवून लुटले

विजय पाटील
मंगळवार, 13 फेब्रुवारी 2018

सांगली - हरिपूरमध्ये महाशिवरात्री निमित्त पहाटे शंकराच्या मंदिरात देवदर्शनसाठी भाविक दाम्पत्य जात होते. त्यांना चोरट्यांनी चाकूचा धाक दाखवून लुबाडल्याची घटना घडली. या घटनेचा प्रसंग सीसीटीव्हीत कैद झाला आहे. त्यावरून पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत..

याबाबत मिळालेली माहिती अशी - सांगलीत हरिपूरमध्ये शंकराचे मंदिर आहे. आज महाशिवरात्र असल्याने भाविकांनी पहाटे पासूनच देवदर्शनासाठी गर्दी केली आहे. सांगली हरिपूर रोडवर एका दाम्पत्यास चाकूचा धाक दाखवत गळ्यातील मंगळसूत्र आणि रोख रक्कम दोन चोरट्यानी लंपास केले. या घटनेमुळे भविकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. पोलीसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला आहे. तसेच सीसीटीव्हीच्या माध्यमातून चोरट्यांचा तपास घेण्यात येत आहे.
 
Web Title: Sangli News robbery incidence in Haripur