सांगली-मिरज शहरात घरफोडी सत्र सुरूच..

विजय पाटील
रविवार, 25 फेब्रुवारी 2018

सांगली -  सांगली आणि मिरज शहरात घरफोडीचे सत्र सुरूच आहे. कोकणे गल्ली श्रीराम बंगल्यामध्ये या महिन्यातील ही दुसरी चोरीची घटना घडली आहे .श्रीराम बंगला, श्री दानेश्वरी बंगला चोरट्यानी फोडून चोरट्यानी तब्बल चाळीस ते पन्नास तोळे सोने रोख रक्कम 25 हजार चांदीचे दागिने असा 13 लाखाचा ऐवज लंपास केला आहे .

याबाबत मिळालेली माहिती अशी की,  मलाप्पा शिधाप्पा कोहल्ली हे  महावितरणमधील निवृत्ती अभियंता आहेत. कोहल्ली कुटूंब हे घराला कुलूप लावून कामानिमित्त 13 फेब्रुवारी रोजी मुबंई येथे गेले होते. काल रात्री आल्यानंतर घरी चोरी झाल्याचा प्रकार उघडकीस आला. घराच्या मुख्य दरवाज्याची कडी कोयंडा तोडलेले आढळले. घरातील तिजोरीतील साहित्य विसकटलेले दिसले. चोरीची माहिती शहर पोलिसांना कोहल्ली कुटूंबाने दिली. त्यानंतर शहर पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन चोरीची माहिती घेतली. तसेच श्वान पथक व ठसे तज्ज्ञांनीही घटनास्थळी भेट पाहणी केली. मिरज शहरात घरफोडीच्या या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.

Web Title: Sangli News robbery incidence in Miraj - Sangli