इस्लामपुरात सदाभाऊंचा पुतळा जाळला

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 3 जून 2017

कर्जमाफी झालीच पाहिजे, स्वामीनाथन आयोग लागू करावा, यासह विविध मागण्यांच्या घोषणा देत संभाजी ब्रिगेड, बळिराजा शेतकरी संघटना यांच्यावतीने हे आंदोलन करण्यात आले.

सांगली - इस्लामपूर येथे कृषीराज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या बंगल्याजवळ असलेल्या रस्त्यावर त्यांचा व मुख्यमंत्र्यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले.

कर्जमाफी झालीच पाहिजे, स्वामीनाथन आयोग लागू करावा, यासह विविध मागण्यांच्या घोषणा देत संभाजी ब्रिगेड, बळिराजा शेतकरी संघटना यांच्यावतीने हे आंदोलन करण्यात आले.

आंदोलनात बळीराजाचे संस्थापक बी. जी. पाटील, संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष सुयोग औंधकर, सचिन थोरबोले, सुधीर कदम, अमोल चव्हाण, अशोक सलगर, आबासो काळे, गणेश काळे आदी कार्यकर्ते भाग घेतला. विशेष म्हणजे सदाभाऊंच्या घरासमोर पोलिस बंदोबस्त असतानाही शेजारील रस्त्यावर हे आंदोलन करण्यात आले.

ई सकाळवरील आणखी ताज्या बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा :
ऐतिहासिक शेतकरी संपात 48 तासात फूट; एक गट संपावर ठाम
मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांना गंडवलं: शरद पवार
शेतकरी संपाबाबत घाईघाईत घेतलेल्या निर्णयाचा पश्चाताप : जयाजी सूर्यवंशी​
चोपडा: भाजीपाला फेकला रस्त्यावर
शेतकऱ्यांचा संप मागे; कर्जमाफीसाठी समिती 
शेतकऱ्यांना मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिलेली आश्वासने
शेतकऱ्यांच्या पदरात पडले काय?; किसान सभा असमाधानी
सत्तर टक्के मागण्या मान्य झाल्याने संप मागे: धोर्डे​

मेनका गांधी रुग्णालयात दाखल

Web Title: sangli news sadabhau khot farmers strike