‘सकाळ’च्या चळवळीने जगणे सुसह्य - राहुल जितकर

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 8 मे 2018

झरे - सकाळ माध्यम समूहाच्या सकाळ रिलिफ फंडातून दुष्काळी भागातील जलसंवर्धनासाठीची चळवळ जगणं सुसह्य करणारी आहे, असे मत आटपाडी तालुका कृषी अधिकारी राहुल जितकर यांनी व्यक्त केले. 

झरे - सकाळ माध्यम समूहाच्या सकाळ रिलिफ फंडातून दुष्काळी भागातील जलसंवर्धनासाठीची चळवळ जगणं सुसह्य करणारी आहे, असे मत आटपाडी तालुका कृषी अधिकारी राहुल जितकर यांनी व्यक्त केले. 

जांभुळणी (ता. आटपाडी) येथे पाणीपुरवठा विहिरीलगत बंधाऱ्यातील गाळ काढण्याचा कामास सुरुवात करण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते. तनिष्का गटाने सुचवल्यानुसार ‘सकाळ रिलिफ फंडातून’ हे काम करण्यात येत आहे.

‘सकाळ’चे निवासी संपादक डॉ. श्रीरंग गायकवाड, उपसरव्यवस्थापक रवींद्र रायकर, सहयोगी संपादक शेखर जोशी, सरपंच संगीता मासाळ उपस्थित होते. तनिष्का गटाने जिजाऊ, सावित्रीबाई फुले, अहल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन केले. शिवराम मासाळ यांनी स्वागत केले. कृषी अधिकारी जितकर म्हणाले, ‘‘ ‘सकाळ’ने बंधाऱ्यातील गाळ काढून सामाजिक बांधिलकी जपली आहे. त्याचे पुण्य पैशात मोजता येणार नाही.’’ 

निवासी संपादक डॉ. गायकवाड म्हणाले,‘‘पाण्यासाठी ग्रामीण भागातील महिला आणि मुलांना त्रास सहन करावा लागतो. पाण्याबाबत मोठी जनजागृतीची गरज आहे. साठवलेल्या पाण्याचे व्यवस्थापनही महत्त्वाचे आहे.’’

सहयोगी संपादक श्री. जोशी यांनी ‘सकाळ’च्या  उपक्रमांची माहिती दिली. उपसरव्यवस्थापक रवींद्र रायकर यांनी सकाळ रिलीफ फंडातून देशभर केलेल्या कामाची माहिती दिली. ‘ॲग्रोवन’चे व्यवस्थापक शीतल मासाळ यांनी  प्रास्ताविक केले. गटप्रमुख दीपाली वाक्षे, उपसरपंच दगडू जुगदर, भाजप महिला आघाडी तालुकाध्यक्ष रेणुका जाधव यांनी मनोगत व्यक्त केले.

Web Title: Sangli News Sakal Relief Fund work in desert area