‘सॅलरी’च्या सभेत प्रश्‍नांचा भडिमार

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 24 जुलै 2017

सांगली - सांगली सॅलरी अर्नर्स सोसायटीच्या १०५ व्या सर्वसाधारण सभेत संस्थेचे भागभांडवल १०० कोटी, सभासद वर्गणी पूर्वीप्रमाणे ४०० रुपये, लाभांश १० टक्के आणि थकीत सभासदांच्या खात्यावर लाभांश जमा करण्यासह सर्व ठराव एकमताने मंजूर करण्यात आले. विरोधकांसह सर्वांनाच प्रश्‍न, शंका विचारण्यासाठी पुरेसा कालावधी देण्यात आला. प्रश्‍न विचारण्यासाठी सभासदांची झुंबड उडाली. सत्ताधाऱ्यांनीच अहवाल आणि विषयपत्रिकेवरील विषय मंजूरच्या घोषणांनी पुढील विषय घेणे भाग पाडले.

सॅलरी सोसायटीचे अध्यक्ष शरद पाटील यांच्या अध्यक्षतेखाली दीनानाथ नाट्यगृहात सर्वसाधारण सभा झाली. सॅलरी कर्ज सुरक्षा योजनेचे सभासदांनी कौतुक केले. चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांना संधीबद्दल अध्यक्ष, संचालक मंडळाचा सत्कार झाला. सभासदांच्या सूचनेनुसार वर्गणी ५०० ऐवजी ४०० रुपये ठेवण्यात आली. अध्यक्ष पाटील यांनी विरोधी व सत्ताधारी सदस्यांनी उपस्थित केलेल्या प्रश्‍नांना समर्पक उत्तरे दिली. त्यांनी १० टक्के लाभांश जाहीर करताना नोटाबंदीतही पारदर्शी कारभाराने ५.८८ कोटींचा विक्रमी नफा झाल्याचे स्पष्ट केले. कर्जावर पाव टक्के व्याज दर कपात केल्याचेही सांगितले. सभासद कर्ज १५ वरून २५ लाखांना मंजुरी देण्यात आली. सॅलरीची सर्वसाधारण सभा रविवारी (ता. २३) दीनानाथ नाट्यगृहात झाली. थकबाकीचे प्रमाण १.७४ टक्के आहे. सोलापूर जिल्हा कार्यक्षेत्रवाढीचा गेल्या वर्षीचा रद्दचा ठराव झाला. उपाध्यक्ष सुहास सूर्यवंशी, प्रदीप कदम, पी. एन. काळे, झाकीरहुसेन चौगुले, प्रकाश पाटील यांनी विविध ठरावांचे वाचन केले. बजरंग कदम, राजू कदम, नंदू ढोबळे, दिलीप शिंदे यांनी प्रश्‍न विचारले. वसंत खांबे यांनी संयोजन केले. यावेळी डी. जी. मुलाणी, जे. के. महाडिक, सुरेंद्र पेंडुरकर, लालासाहेब मोरे  उपस्थित होते.

Web Title: sangli news salary arners society