सलमानचा बॉडीगार्ड शेरा खेळणार मिरजेत कुस्ती

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 23 जुलै 2018

मिरज - बॉलीवुडचा सुपरस्टार सलमान खान याचा बॉडीगार्ड शेरा हा मिरजेत कुस्ती खेळणार आहे. श्री अंबाबाई तालीम संस्थेने हा योग जुळवून आणला आहे. संस्थेचे अध्यक्ष संजय भोकरे यांनी ही माहीती दिली. 

मिरज - बॉलीवुडचा सुपरस्टार सलमान खान याचा बॉडीगार्ड शेरा हा मिरजेत कुस्ती खेळणार आहे. श्री अंबाबाई तालीम संस्थेने हा योग जुळवून आणला आहे. संस्थेचे अध्यक्ष संजय भोकरे यांनी ही माहीती दिली. 

संस्थेच्यावतीने शेरा उर्फ गुरमीतसिंग याला आरोग्यरत्न पुरस्काराने सन्मानित केले जाणार आहे. बुधवारी (ता.25) दुपारी अडीच वाजता महसुलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते चांदीची गदा, मानपत्र व रोख रक्कम देऊन त्याचा सन्मान होईल. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संजय भोकरे असतील.

श्री भोकरे म्हणाले, अंबाबाई संस्थेने विविध खेळांना नेहमीच उत्तेजन दिले आहे. संस्थेने अनेक नामवंत खेळाडू घडवले आहेत. सलमान खान आणि शेरा हे स्वतः व्यायामप्रेमी आहेत. दररोज दोन तास व्यायाम करतात. शेरा यांची टायगर ही सिक्युरीटी कंपनी असून त्याद्वारे चित्रपट, राजकारण, उद्योग आदी क्षेत्रांतील अनेक नामवंतांना सुरक्षा पुरवली जाते.  अंबाबाई तालीम संस्थेतर्फे आरोग्यरत्न पुरस्कार देऊन त्यांच्या कामाचा गौरव केला जाईल.

यावेळी संस्थेच्या हॉलमध्ये काही पैलवानांसोबत ते मैत्रीपुर्ण कुस्तीही खेळतील. सांगली, मिरजेतील नवोदीत पैलवानांना डावपेच शिकवतील.

Web Title: Sangli News Salman Khan Bodyguard Shera Play wrestle in Miraj