मोर्चाच्या पार्श्वभूमीवर सांगलीत भिडे यांचे 30 फुटी बॅनर

विजय पाटील
सोमवार, 26 मार्च 2018

सांगली -  कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणी ‘शिवप्रतिष्ठान’चे संस्थापक संभाजीराव भिडे यांच्यावर करण्यात आलेल्या तथ्यहीन आरोपांच्या निषेधासाठीच २८ मार्चला मोर्चाचे आयोजन करण्यात आले. यासाठी सध्या सांगली परिसरात जोरदार तयारीही करण्यात येत आहे. मोर्चाच्या पार्श्वभूमीवर भिडे यांचे 30 फुटी बॅनर सांगलीतील विविध चाैंकामध्ये झळकत आहे. ​

सांगली -  कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणी ‘शिवप्रतिष्ठान’चे संस्थापक संभाजीराव भिडे यांच्यावर करण्यात आलेल्या तथ्यहीन आरोपांच्या निषेधासाठीच २८ मार्चला मोर्चाचे आयोजन करण्यात आले. यासाठी सध्या सांगली परिसरात जोरदार तयारीही करण्यात येत आहे. मोर्चाच्या पार्श्वभूमीवर भिडे यांचे 30 फुटी बॅनर सांगलीतील विविध चाैंकामध्ये झळकत आहे.  

सध्या मोर्चासाठी जनजागृती करण्यात येत असून यात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन शिवप्रतिष्ठान’तर्फे करण्यात आले आहे. मोर्चासाठी वातावरण निर्मिती करण्यासाठी विश्रामबाग चाैक, राजवाडा चाैक, पुष्कराज चाैक, मारूती चाैक अशा मुख्य चाैकासह अन्य ठिकाणीही भिडे यांचे ३० फुटी बॅनर लावण्यात आले आहेत.   

‘शिवप्रतिष्ठान’तर्फे सांगलीत आयोजित या मोर्चासह राज्यभरात विविध जिल्ह्यांतही मोर्चा काढण्यात येणार आहे.  त्यासाठी जिल्हाभरात मोठी संपर्क मोहीम राबविण्यात येत आहे. 

Web Title: Sangli News Sambhaji Bhide 30 foot banner