नायब तहसीलदारांसह महसूल पथकावर वाळू तस्करांचा हल्ला

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 8 जून 2017

एवढ्यावरच न थांबता स्वत: ट्रक चालविण्यास बसला आणि ट्रक वळवून सांगोल्याच्या दिशेने घेऊन जाऊ लागला. पिंटू नाईक ट्रक घेऊन सांगोल्याकडे जात असताना महसूलच्या पथकाने पाठलागाचा प्रयत्न केला.

कवठेमहांकाळ - मिरज-पंढरपूर राज्यमार्गावर वाळूतस्कराने सहकाऱ्यांच्या मदतीने नायब तहसीलदार रुपाली रेडेकर यांच्यासह तलाठ्यांच्या पथकाला शिवीगाळ व दमदाटी करीत आणि वाहनांवर दगडफेक करीत महसूल प्रशासनाने पकडलेला ट्रक पळवून नेला. ही घटना बुधवारी घडली.

मंडल अधिकारी अशोक कोळी यांनी रात्री उशीरा फिर्याद दिल्यानंतर पिंटू नाईक यांच्यासह चार अज्ञात वाळू तस्करांविरोधात कवठेमहांकाळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

बुधवारी दुपारनंतर नायब तहसिलदार रुपाली रेडेकर मंडल अधिकारी अशोक कोळी, तलाठी अमोल जंगम, सुरेश सुर्यवंशी, प्रमोद साठे आणि प्रतिभा धुमाळे यांच्या पथकाने मिरज पंढरपूर मार्गावरील आगळगांव फाट्यावर अवैध वाळू वाहतूक करणारा पिंटू नाईक यांचा ट्रक (MH10Z-4343) पकडला. कारवाई केलेला हा ट्रक तहसील कार्यालयाकडे घेऊन येत असताना मालक पिंटू नाईक हा दोन साथीदारांसह मागून इनोव्हा कार घेऊन आला. गाडी ट्रकच्या आडवी उभी केली. नायब तहसीलदार रेडेकर आणि तलाठ्यांच्या पथकाला शिवीगाळ करुन दमदाटी केली. मार्गावरील इतर वाहनांवर दगडफेक सुरु केली. हा प्रकार जवळपास एक तास सुरू होता. 

एवढ्यावरच न थांबता स्वत: ट्रक चालविण्यास बसला आणि ट्रक वळवून सांगोल्याच्या दिशेने घेऊन जाऊ लागला. पिंटू नाईक ट्रक घेऊन सांगोल्याकडे जात असताना महसूलच्या पथकाने पाठलागाचा प्रयत्न केला. त्यावेळी वाळू तस्करांचे आणखी एक टोळके स्काॅर्पिओ गाडीतून नाईकच्या मदतीसाठी आले. त्यांनी गाडी आडवी मारत महसूल पथकाला रोखून धरले. त्यामुळे पिंटू नाईक ट्रक पळवून नेण्यात यशस्वी ठरला. 

ई सकाळवरील आणखी ताज्या बातम्यांसाठी क्लिक करा -
मुख्यमंत्री येईपर्यंत जाळू नका; शेतकऱ्याने चिठ्ठी लिहून केली आत्महत्या
तिडके, डोईफोडेचे अपराध अन् निशब्द पंकजा
म्यानमारच्या विमानाचे अंदमानमध्ये सापडले अवशेष; सर्व प्रवाशांचा मृत्यू
मंदसोरच्या जिल्हाधिकारी, एसपींची बदली; राहुल गांधी शेतकऱ्यांच्या भेटीला
धुळे: कर्जमाफीसाठी शिवसेनेचे 'जलसमाधी' आंदोलन
पाकिस्तानचा दक्षिण आफ्रिकेवर 19 धावांनी विजय​
#स्पर्धापरीक्षा - बुद्धिबळ : कार्लसनची जगज्जेतेपदाची हॅट्ट्रीक​
शेतकऱ्यांच्या जिवावर उठलेले सरकार आंदोलनावरून काँग्रेस, माकपचे टीकास्त्र​
जनावरे खरेदी-विक्री निर्बंधास सर्वोच्च न्यायालयात आव्हान

Web Title: Sangli news sand mafia attacked on tahsildar