अवयवदानाने पाचजणांना मिळाले जीवनदान

अवयवदानाने पाचजणांना मिळाले जीवनदान

सांगली - येथील संगीता अभय शहा (वय ५२) यांचे काल निधन झाले. वाढदिवसादिवशीच ही दुर्दैवी घटना घडली. ब्रेनडेड अवस्थेत त्यांचे अवयवदान करून पाच रुग्णांना  जीवनदान देण्यात आले आहे. अशा प्रकारे अवयवदान करून गरजू रुग्णांना नवजीवन मिळवून देण्याची सांगलीतील ही पहिलीच घटना असावी. गणपती पेठेतील प्रसिद्ध व्यापारी (कै.) अभय लीलाचंद शहा यांच्या त्या पत्नी होत. त्यांच्या मागे तीन मुली, जावई, सासू असा परिवार आहे.   
श्रीमती शहा या काल अचानक अत्यवस्थ बनल्याने  त्यांना डॉ. रवीकांत पाटील यांच्या सेवा सदन लाईफ लाईन हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. उपचार सुरू असताना अशुद्ध रक्त शुद्ध करून मेंदूला पुरवणारी यंत्रणा निकामी झाल्याचे डॉक्‍टरांच्या लक्षात आले. त्यांनी ती माहिती रुग्णाच्या नातेवाईकांना दिली. कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगरच जणू कोसळला. त्यातूनही सावरत श्रीमती शहा यांच्या इच्छेनुसार त्यांचे अवयवदान करण्यासाठी कुटुंबीयांनी पुढाकार घेतला. त्यांच्यासमोर पुण्यातील सह्याद्री, जहाँगीर आणि रुबी हॉस्पिटल असे पर्याय होते. त्यांचे भाऊ संतोष, प्रसन्न, विजय दोन्ही दीर नितीन व अतुल शहा यांनी अवदान प्रक्रिया पूर्ण करण्यास संमती दिली. त्यानंतर तातडीने डॉ. अमृता फाटक व पुण्यातील सह्याद्री हॉस्पिटलशी संपर्क साधून रुग्णाला तिकडे नेण्याचा निर्णय घेतला. रात्रीतच ते पुण्यात दाखलदेखील झाले. तत्काळ दोन्ही डोळे, दोन मूत्रपिंडे आणि यकृत असे अवयव दान घेण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. तातडीने गरजू पाच रुग्णांना अवयवांचे रोपणही करण्यात आले. त्यांनी पाच जणांच्या आयुष्यात नवजीवन फुलवले, अशी  भावना शहा कुटुंबीय व नातेवाईकांनी व्यक्त केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com