रामसाहेब वेलणकर यंदाचे ‘सांगली भूषण’

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 12 नोव्हेंबर 2017

सांगली - यंदा सांगली भूषण पुरस्कार गजानन मिल्सचे मालक व दानशूर समाजसेवक रामचंद्र विष्णुपंत तथा रामसाहेब वेलणकर यांना जाहीर झाला आहे. विश्‍वजागृती मंडळाच्या वतीने गेल्या वीस वर्षांपासून हा पुरस्कार दिला जातो. पंचवीस हजार रुपये व सन्मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. समारंभपूर्वक हा पुरस्कार दिला जाईल, असे मंडळाचे अध्यक्ष अरुण दांडेकर यांनी सांगितले.

सांगलीतील विविध संस्थांचे आधारवड राहिलेल्या उद्योगरत्न वि. रा. वेलणकर यांच्या दानशूरतेचा आणि उद्यमशीलतेचा वारसा पुढे पुढे चालवणाऱ्या रामसाहेब ९१ व्या वर्षात पदार्पण करीत आहेत. १९ नोव्हेंबर १९२६ मध्ये जन्मलेल्या रामसाहेबांनी गेली ६३ वर्षे गजानन मिल्सची धुरा वाहिली आहे.

अनंत अडचणींवर मात करीत त्यांनी आपल्या कर्तबगार सुकन्यांच्या मदतीने या व्यवसाय सुरू ठेवण्याची जिद्द बाळगली आहे. चारित्र्यवान उद्योजक म्हणून त्यांचा सांगलीकरांना परिचय आहे. तीव्र सामाजिक जाणिवेने त्यांनी अनेक सामाजिक संस्थांना नेहमीच मदतीचा हात दिला. वेलणकर अनाथ बालकाश्रम संस्थेचे ते अध्यक्ष आहेत. साधी राहणी, चिकाटी-प्रामाणिकपणा या त्यांच्या गुणांमुळे ते आज नवउद्योजकांसाठी आदर्शवत आहेत. सांगलीच्या उद्योग व सांस्कृतिक व सामाजिक क्षेत्रासाठी निरंतर योगदान देणाऱ्या एका ज्येष्ठ व्यक्तिमत्त्वाचा यानिमित्ताने यथोचित गौरव होत असल्याची सार्वत्रिक भावना आहे.

Web Title: Sangli News Sangli Bhushan award to Ramsaheb Velankar