सांगली महापालिका निवडणूकीसाठी भाजपची पहिली यादी बुधवारी

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 30 जून 2018

सांगली - ‘‘महापालिका निवडणुकीसाठी भाजपच्या मुलाखती १ आणि २ जुलै रोजी होतील. बुधवारी (ता. ४ जुलै) पहिली उमेदवार यादी जाहीर  केली केली जाईल. काँग्रेस-राष्ट्रवादीतून पक्षात येणाऱ्यांनाही मुलाखतीतूनच जावे लागेल. ऐनवेळी कोणी आले तर लवचिकता दाखवली जाईल,’’ अशी माहिती भाजप नेते, महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.

सांगली - ‘‘महापालिका निवडणुकीसाठी भाजपच्या मुलाखती १ आणि २ जुलै रोजी होतील. बुधवारी (ता. ४ जुलै) पहिली उमेदवार यादी जाहीर  केली केली जाईल. काँग्रेस-राष्ट्रवादीतून पक्षात येणाऱ्यांनाही मुलाखतीतूनच जावे लागेल. ऐनवेळी कोणी आले तर लवचिकता दाखवली जाईल,’’ अशी माहिती भाजप नेते, महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. महापालिका निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर भाजपच्या कोअर कमिटीची बैठक आमराईतील ऑफिसर्स क्‍लबमध्ये आज झाली. त्यानंतर ते पत्रकारांश बोलत होते. 

मंत्री श्री. पाटील म्हणाले,‘‘निवडणूक जाहीर झाल्यानंतर आज प्रमुख कोअर कमिटीची बैठक झाली. तीनशेहून अधिक इच्छुकांचे अर्ज पक्षाकडे आले आहेत. मुलाखती १ आणि २ जुलैला घेतल्या जातील. भाजप लोकशाहीवर चालणार पक्ष आहे. चार जुलै रोजी पहिली उमेदवार यादी जाहीर केली जाईल 
आणि अर्ज भरले जातील.’’

ते म्हणाले,‘‘राज्य सरकारकडून महापालिकेचा कशाप्रकारे मदत करून विकास होईल तसेच महापालिकेत काय करणार? या दोन मुद्द्यांवर पक्षाचा वचननामा करून निवडणूक लढवली जाईल. मुलाखतीनंतरच उमेदवारी निश्‍चित होईल. काँग्रेस व राष्ट्रवादीतून आलेल्यांना  देखील मुलाखत द्यावी लागेल. ऐनवेळी कोणी पक्षात आले तर लवचिकता दाखवली जाईल. कोणी उमेदवारी निश्‍चित झाल्याचा प्रचार करत असले, तरी अंतिम निर्णय पक्षच घेईल. युतीबाबत शिवसेना, रिपाइं आणि  समविचारी पक्षांशी चर्चा केली जाईल.’’

खासदार पाटील अनुपस्थित
कोअर कमिटीच्या बैठकीत आमदार सुधीर गाडगीळ, आमदार सुरेश खाडे, जिल्हा परिषद अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख, मकरंद देशपांडे, शेखर इनामदार आदी उपस्थित होते. परंतु खासदार संजय पाटील यांची अनुपस्थिती खटकली. याबाबत विचारल्यानंतर चंद्रकांतदादांनी, काही कारणास्तव ते आले नसल्याचे सांगितले.

सांगली, मिरजेत मुलाखती
एक जुलै रोजी सांगलीत कच्छी जैन भवनमध्ये दहा प्रभागांतील मुलाखती सकाळी दहा ते सायंकाळी  सहापर्यंत होतील. तर दोन जुलै रोजी मिरजेतील पटवर्धन हॉलमध्ये मुलाखती होतील.

सांगली, मिरजेत ‘राष्ट्रवादी’तर्फेही तयारी

राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे महापालिका निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती १ व २ जुलै रोजी होणार आहेत. वसंत कॉलनीतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयात या मुलाखती होणार आहेत, अशी माहिती राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष संजय बजाज यांनी दिली.

एकूण २९८ जणांनी पक्षाकडे अर्ज दिले आहेत. त्यांच्या मुलाखती १ व २ जुलैला आयोजित केल्या आहेत. रविवारी (ता. १) सांगलीतील प्रभाग क्रमांक ९ ते १९ या प्रभागातील इच्छुकांच्या मुलाखती होतील. तर सोमवारी (ता. २) मिरज व कुपवाड येथील प्रभाग क्रमांक १ ते ८ आणि २० या प्रभागातील इच्छुकांच्या मुलाखती सकाळी १० ते ५ या वेळेत घेण्यात येणार आहेत. इच्छुकांनी उमेदवारीसाठी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत शनिवारपर्यंत (ता. ३०) आहे. त्यांनी पक्ष कार्यालयात अर्ज जमा 
करावेत.

जयंत पाटील सांगली दौऱ्यावर
प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील हे उद्यापासून (ता. ३०) सांगली दौऱ्यावर येणार आहेत. ते २ जुलैपर्यंत सांगलीत असून त्यांच्या उपस्थितीत मुलाखती होणार आहेत. विधानसभा क्षेत्राध्यक्ष कमलाकर पाटील, सुरेश पाटील आदी मुलाखती घेणार आहेत.

 

Web Title: Sangli News Sangli Corporation Election