इचलकरंजीला वारणेचे पाणी देण्यासाठी सांगलीचाही विरोध

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 18 मे 2018

तुंग, बागणी - वारणा नदीतून अमृत योजनेद्वारे इचलकरंजीला पाणी देण्याला विरोध म्हणून वारणा काठावरील अठरा गावांत बंद पाळण्यात आला. 

कवठेपिरान, सावळवाडी, माळवाडी, दूधगाव, समडोळीत मोटारसायकल रॅली निघाली. माजी जि. प. सदस्य भीमराव माने यांनी नेतृत्व केले.  समडोळी येथे स्वाभिमानीचे संजय बेले, कवठेपिरानला भीमराव माने, उपसरपंच प्रताप भोसले, दूधगावचे सरपंच विकास कदम यांनी नेतृत्व केले. सावळवाडीचे उपसरपंच राहुल माणगावे, सरपंच राजेंद्र उपाध्ये यांनी निषेध केला. माळवाडीचे भरत जाधव, उपसरपंच रमेश निरवाने यांनी  नेतृत्व केले.

गाव बंद पहिला टप्पा होता. दुसऱ्या टप्प्यात वारणा काठावरील ७३ गावांची परिषद घेणार आहे.
-शरद पाटील (ढवळी), 

सदस्य, वारणा बचाव कृती समिती

वारणा पट्टा ठप्प
बागणी - बागणी, शिगाव, ढवळी, कोरेगाव, बहादूरवाडी, फार्णेवाडीत उत्स्फूर्त बंद होता. ढवळी येथील बैठकीत आज बंदचा निर्णय झाला होता.  माजी सरपंच शरद पाटील म्हणाले,‘‘समडोळी ते मणदूर मोटारसायकल रॅली काढून निषेध करु. शेतकरी व ग्रामस्थांची पाणी परिषद घेण्याचे नियोजन आहे.’’  ढवळीच्या सरपंच पद्मावती माळी, बागणीचे सरपंच संतोष घनवट, काकाचीवाडीचे सरपंच प्रमोद माने, शिगावचे सरपंच उत्तम गावडे, कोरेगावचे सरपंच मयुर पाटील, फार्णेवाडीचे उपसरपंच संतोष सिध्द उपस्थित होते.

कुरळप परिसर बंद 
कुरळप - अमृत योजनेला विरोध म्हणून कुरळपसह चिकुर्डे, येलूर, कुंडलवाडी, तांदूळवाडी, भरतवाडी आदी गावांत बंद पाळण्यात आला. 
 
Web Title: Sangli News sangli oppose to Give warana water to Ichalkaraji