बेथेलहेमनगरवासीयांचा सांगली महापालिका निवडणुकीवर बहिष्कार

संतोष भिसे
रविवार, 22 जुलै 2018

मिरज - बेथेलहेमनगर परिसरातील रहिवाशांनी महापालिका निवडणुकीत मतदानावर बहिष्काराचा निर्णय घेतला आहे. सत्तर वर्षांपासून या उपनगरासाठी रस्ता नसल्याने रहिवाशी आक्रमक झाले आहेत. याबाबतचे निवेदन प्रसिद्धीस दिले आहे. 

मिरज - बेथेलहेमनगर परिसरातील रहिवाशांनी महापालिका निवडणुकीत मतदानावर बहिष्काराचा निर्णय घेतला आहे. सत्तर वर्षांपासून या उपनगरासाठी रस्ता नसल्याने रहिवाशी आक्रमक झाले आहेत. याबाबतचे निवेदन प्रसिद्धीस दिले आहे. 

डेव्हीड सर्वदे, अनिल मोहीते, शिवाजी त्रिमुखे, मोझेस मोहीते, अभय मोरे, संजय मोहीते, विनोद मोरे, सॅमसन रास, विलास गायकवाड, डी. आर. लोंढे, विकास सातपुते आदींनी सांगितले कि, या उपनगरासाठी पक्का रस्ता नाही. सत्तर वर्षांपासून विविध जाती-धर्माचे लोक येथे राहतात. आमच्या तीन पिढ्या गेल्या तरी नगरपालिकेने किंवा महापालिकेने पक्का रस्ता दिलेला नाही. मिरज-सांगली रस्त्याच्या दक्षिणेला सिद्धिविनायक होंडा शोरुमच्या पिछाडीस हे उपनगर आहे.

यामध्ये विनोबा भावे कॉलनी, मिरजवाडी, सूरजनगर आदी परिसर येतो. पुर्वी प्रभाग क्रमांक 25 मध्ये त्याचा समावेश होता. सध्याच्या निवडणुकीत प्रभाग क्रमांक 19 मध्ये समावेश झाला आहे. सुमारे दहा हजारावर लोकवस्ती आहे. वसाहतीपासून सांगली-मिरज रस्ता अवघ्या तीनशे मीटरवर आहे; पण त्याला जोडणारा पक्का रस्ता महापालिकेने दिलेला नाही. 

यापुर्वी निवेदने, रस्ता रोको, अधिकाऱ्यांच्या भेटी अशा सर्व मार्गांनी समस्या प्रशासनापर्यंत नेली; पण आश्‍वासनापलिकडे काही मिळाले नाही. चिखल आणि दगडांनी भरलेल्या कच्च्या रस्त्यावरुन प्रवास करावा लागतो. सध्या प्रचारासाठी येणाऱ्या उमेदवारांनाही आम्ही हीच समस्या सांगत आहोत. रस्ता नसल्याने मतदान करणार नाही असे सुनावले आहे. निवडणुक यंत्रणेला तसे निवेदन देणार असल्याचे या रहिवाशांनी सांगितले.

Web Title: Sangli News Sangli Palika election