मोहनराव कदम खासदार झाले तरी आम्हाला अडचण नाही - देशमुख

प्रताप मेटकरी
सोमवार, 8 जानेवारी 2018

विटा - पंचायतराज व्यवस्थेत काम केलेला माणूस मोठा व्हावा, अशी आमची भूमिका आहे. मोहनराव कदम यांनी तळागाळात काम करून आमदारकीपर्यंत झेप घेतली आहे. मोहनराव कदम खासदार झाले तरी आमची अडचण नाही, असे स्पष्ट मत सांगली जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख यांनी व्यक्त केले.   

विटा येथील पंचफुला हॉलमध्ये खानापूर तालुका पंचायत समितीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या कृतज्ञता सोहळयात ते बोलत होते.

श्री देशमुख म्हणाले,  जिल्हा परिषद अध्यक्ष पदाच्या निवडीवेळी त्यांनी मला बोटाला धरून अध्यक्ष करायला हवे होते. परंतु त्यावेळी त्यांची राजकीय अपरिहार्यता होती. पुढे त्यांनी सभापती निवडीवेळी सहकार्याची भूमिका ठेवली. जिल्ह्याचा सर्वांगीण विकास व्हावा, हीच भूमिका घेऊन काम करत आहोत,

कडेगाव तालुक्यात कदम गट आणि आमचा पक्षीय पातळीवर टोकाचा राजकीय संघर्ष असतो. परंतु तालुक्याच्या विकासासाठी आम्ही एकत्र असतो. आमच्यात विकासासाठी समनव्य आहे. आम्ही संस्कृती सोडून राजकारण केले नाही. कधीही संस्कृती सोडून राजकारण करणार नाही, ही भूमिका घेऊन काम करत आहे.

-  संग्रामसिंह देशमुख

आमदार अनिलराव बाबर, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सुहास बाबर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजीत राऊत, विटा नगरपालिकेचे नगरसेवक अमोल बाबर, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष दतूशेठ सुर्यवंशी, काँग्रेसचे खानापूर तालुकाध्यक्ष रविअण्णा देशमुख, काँग्रेसचे जेष्ठ नेते रामरावदादा पाटील, खानापूर पंचायत समिती सभापती मनीषा बागल, उपसभापती बाळासो नलवडे, गटविकास अधिकारी संतोष जोशी यांची प्रमुख उपस्थिती होती.
  
Web Title: sangli News Sangramsingh Deshmukh Comment