शिल्पकारांना आले चांगले दिवस

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 20 जुलै 2017

सांगली - शिल्पकला आनंददायी तर आहेच; शिवाय करिअरसाठी तो आता उत्तम पर्याय आहे. देशात शिल्पकलेला चांगले दिवस आले आहेत, असे मत  प्रसिद्ध शिल्पकार संजय तडसरकर यांनी व्यक्त केले. येथील  शांतिनिकेतन लोकविद्यापीठातील कलाविश्‍व महाविद्यालयात ‘शिल्पकला आणि सिरॅमिक पॉटरीज्‌’ अभ्यासक्रमाचे आज त्यांच्या हस्ते उद्‌घाटन झाले. 

ते म्हणाले, ‘‘हॉटेल्स, चौक, मंदिर या ठिकाणी  सजावटीचा मुख्य भाग म्हणजे मूर्ती, शिल्प. मग ते व्यक्तीचे असो किंवा काल्पनिक, त्याला आता महत्त्व आले आहे. अनेक ऐतिहासिक, पौराणिक मालिकांमध्ये शिल्पांची मागणी वाढली आहे. या क्षेत्रात करिअरला  मोठा वाव निर्माण झाला आहे. सांगलीत हा अभ्यासक्रम सुरू होणे आनंददायी आहे.’’

प्राचार्य बाळासाहेब पाटील यांनी प्रास्ताविक केले. ते म्हणाले,‘‘एक वर्षाचा पायाभूत अभ्यासक्रम झाल्यानंतर पुढील चार वर्षांच्या या अभ्यासक्रमाला प्रवेश घेता येतो.’’ 

यानिमित्ताने शिल्पकार आप्पासाहेब घाटगे आणि सुनील खाडे यांनी प्रात्यक्षिके दाखवली. व्यक्तिशिल्प आणि काल्पनिक शिल्प त्यांनी साकारले.  उपसंचालक डी. आर. थोरात, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष प्रमोद चौगुले, सुवर्ण महोत्सव समितीचे कार्यवाह दादासाहेब भगाटे, मोहन अग्रवाल, महेश कराडकर, प्रशासकीय अधिकारी एम. के. आंबोळे, प्रा. शशिकांत जगताप आदी उपस्थित होते. प्रा. सत्यजित वरेकर यांनी परिचय करून दिला. प्रा. मधुकर कराळे यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. भाऊ ननावरे यांनी आभार मानले.

Web Title: sangli news Sculpture

टॅग्स