...तर अरुण लाडांना दोष कसा देणार? - शरद पवार

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 30 एप्रिल 2018

पलूस -कडेगावच्या पोटनिवडणुकीत आम्ही वेगळी भूमिका घेतली तर अरुण लाड आणि त्यांच्या सहकाऱ्यांना दोष कसा द्यायचा याचा विचार मित्रपक्षाने करावा, असा इशारा राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिला.

सांगली - जिल्ह्यातील पलूस - कडेगाव मतदारसंघाची पोटनिवडणूक लागली आहे. तेथे निवडणूक लढवण्याबाबत अरुण लाड यांच्याशी चर्चा करून निर्णय घेऊ. सातारा विधान परिषदेची जागा आमची असताना तेथे बंड करून ती जागा सत्तेचा, साधनाचा, संपत्तीचा वापर करून हिसकावून घेतली. मग पलूस -कडेगावच्या पोटनिवडणुकीत आम्ही वेगळी भूमिका घेतली तर अरुण लाड आणि त्यांच्या सहकाऱ्यांना दोष कसा द्यायचा याचा विचार मित्रपक्षाने करावा, असा इशारा राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिला.

पुण्यात झालेल्या पक्षाच्या बैठकीत शरद पवार यांनी आगामी निवडणुकांचा आढावा घेतला. त्या लढवताना रास्त कारण असल्यास मित्रपक्षांशी समन्वय करण्याची तयारी असल्याचे त्यांनी सांगितले. त्यावेळी सांगली-सातारा विधान परिषदेच्या निवडणुकीच्या बंडखोरीचा उल्लेख त्यांनी भाषणात केला. सांगली-सातारा विधान परिषदेच्या निवडणुकीत काँग्रेसने बंड करून राष्ट्रवादीला आव्हान दिले आणि त्या जागेवर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मोहनराव कदम यांना निवडून आणले होते. ती सल पवार यांच्या भाषणातून समोर आली.

 

Web Title: Sangli News Sharad Pawar comment