गांधी हत्येत सावरकरांना कॉंग्रेसनेच गोवले - मोरे 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 22 एप्रिल 2018

सांगली - गांधी हत्येशी स्वातंत्र्यवीर सावरकरांचा काहीही संबंध नव्हता, मात्र कॉंग्रेसने माफीचा साक्षीदार उभा करून त्याच्या माध्यमातून सावरकरांना गोवले होते. न्यायालयाने निर्दोष ठरवल्यानंतरही कॉंग्रेसचे ते प्रयत्न सुरुच राहील, असे मत ज्येष्ठ सावरकर अभ्यासक शेषराव मोरे यांनी व्यक्त केले. 

येथे सुरु असलेल्या तिसाव्या सावरकर साहित्य संमेलनात श्री. मोरे यांची मुलाखत बालाजी चिरडे आणि अशोक तुळपुळे यांनी घेतली. श्री. मोरे म्हणाले, ""गांधी हत्येच्या कटात नऊ जणांना अटक झाली होती. त्यात नथुराम गोडसे याच्यासह दोघांना फाशी झाली. त्यापैकी दिगंबर बडगे हा माफीचा साक्षीदार झाला आणि फाशीपासून वाचण्याच्या मोबदल्यात त्याने सावरकरांचे नाव गोवले. खोट्या साक्षी दिल्या. बडगे या शस्त्र विकायचा. त्याच्याकडून गोडसे व साथीदारांनी शस्त्र घेतले होते, मात्र गांधी हत्येच्या साक्षीत बडगे याने उभे केलेले चित्र वास्तवाला धरून नव्हते. केवळ त्याच्या साक्षीवर सावरकरांना दोषी ठरवता येणार नव्हते. इतर काही पुरावे नसल्याने ते निर्दोष झाले. त्यानंतर कपूर आयोग नेमला गेला. त्या आयोगाने अधिकारात नसताना सावरकरांना दोषी ठरवण्याचा घाट घातला. हे सारे कॉंग्रेस सरकारचेच कारस्थान होते.''

Web Title: Sangli News Sheshrao More comment